You are currently viewing मोरगाव केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिन साजरा

मोरगाव केंद्र शाळेत आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिन साजरा

*बांदा*

सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहिर करण्यात आले असून या तृणधान्या विषयी विद्यार्थ्यांच्या मध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून जिल्हा परिषद केंद्र शाळा मोरगाव नंबर एक शाळेत विविध तृणधान्याविषयी जनजागृती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे.


यावेळी परिसरात उपलब्ध असलेल्या तांदूळ मका ,नाचणी,वरी, गहू, बाजरी इत्यादी धान्यांची ओळख व्हावी म्हणून प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याचबरोबर विविध कडधान्याचे ही प्रदर्शन मांडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तृणधान्ये व कडधान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. गावचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोरख यांनी विद्यार्थ्यांना कडधान्या विषयी व आपल्या दैनंदिन आहाराविषयी मार्गदर्शन केले मोरगाव गावचे सरपंच संतोष आईर यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष देविदास पिरणरकर ,माता पालक ,शिक्षक पालक संघ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मणिपाल राऊळ यांनी केले. सर्वांचे स्वागत मुख्याध्यापिका भाग्यश्री कुबल यांनी केले, प्रास्ताविक उपशिक्षिका स्वाती पाटील यांनी केले .कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर सावंत, अंगणवाडी सेविका हेमा नाईक मॅडम,विद्यार्थी व पालक यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा