You are currently viewing कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक शिवराजेश्वर मंदिर मध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते की दक्षिणा मागण्यासाठी मनसेचा सवाल…

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक शिवराजेश्वर मंदिर मध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते की दक्षिणा मागण्यासाठी मनसेचा सवाल…

जगातील एकमेव असलेल्या शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या डागडुजीसाठी परशुराम उपरकर यांनीच आमदार असतानाच निधी मंजूर करून घेतला.

आमदार वैभव नाईक फुकटचे श्रेय घेत असल्याचा मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचा आरोप

जगातील एकमेव असलेले शिवाजी महाराजांचे मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्या वर आहे या मंदिराची डागडुजी करण्यासाठी तत्कालीन विधान परिषदेचे आमदार माननीय परशुराम उपरकर यांनी सन २००८ मध्ये डागडुजी करण्यासाठी आवाज उठवला होता या कामासाठी निधी मंजूर करा अशा प्रकारची मागणी श्री.उपरकर यांनी सातत्याने लावून धरली होती.या मागणीची दखल घेत विधानपरिषदेचे सभापती मा.शिवाजीराव देशमुख यांनी निधी मंजुर करुन काम सुरु करण्याचे आदेश तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांना दिले होते.श्री.तटकरे यांनी १ कोटीचा निधी मंजुर केला होता. हा निधी मंजूर केल्यानंतर सदर कामास पुरातत्व खात्याने विरोध केला होता यावेळी सर्व अडचणी समजून घेऊन उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. सदर निधी मंजूर झाल्यानंतर हे काम पुरातत्व खात्याचे की सार्वजनिक बांधकाम खात्याचे या गोंधळामुळे अडकले होते.या सर्व बाबी विधिमंडळाच्या पटलावर आजही आहेत. तत्कालीन सां.बा. कार्यकारी अभियंता भावे यांनीही मंदिराच्या कामाच्या डागडुजीसाठी प्रयत्न केले होते.
असे असताना आताचे आमदार केवळ मंदीर परिसरात फिरुन फोटोसेशन करत फुकाचे श्रेय घेत असल्याची टीकाही मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =