You are currently viewing व्हेदर रिपोर्ट यंत्राची जागा बदलण्याची मागणी 

व्हेदर रिपोर्ट यंत्राची जागा बदलण्याची मागणी 

माजी सभापती निलेश सामंत यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

 

वेंगुर्ला :

 

म्हापण मंडळामध्ये गेली 3 वर्ष व्हेदर रिपोर्ट मध्ये बाकीच्या लगतच्या मंडळापेक्षा बरीच तफावत आढळते. त्यामुळे दरवर्षी पीक विम्याची रक्कम भरून पण अनेक शेतकरी यांना नुकसानी नंतर पीक विमा रक्कम मिळत नाही. ते या योजनेमध्ये वंचित राहतात त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते. ही बाब माजी सभापती निलेश सामंत यांनी आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच व्हेदर रिपोर्ट यंत्राची जागा बदलून दुसरीकडे घेण्याची विनंती केली. पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी वेदर स्टेशन इतरत्र बदलून देणे त्याच प्रमाणे चालू वर्षी म्हापण मंडळ मधील शेतकऱ्यांना विमा कवाचा पासून वंचित राहावं लागेल त्यासाठी संबंधित खात्याशी चर्चा करून वेंगुर्ले तालुक्यातील इतर मंडळ क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा कवचाच्या सरासरी विमा कवच म्हापण मंडळातील शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच या विषयी लवकरच तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन दिले.

यावेळी परुळे चेअरमन तथा कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, माजी चेअरमन प्रकाश राणे, परुळे व्हा. चेअरमन तथा बाजार समिती सदस्य प्रसाद पाटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा