स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘एस. एस.जी. एस. थिंक टँक’ अंतर्गत ‘इ- पेपर’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘एस. एस.जी. एस. थिंक टँक’ अंतर्गत ‘इ- पेपर’ या विषयावर दैनिक कोकणसाद व कोकणसाद लाईव्हचे सावंतवाडी येथील करसपाॅन्डंट ‘ श्री. विनायक गावस’ हे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी तसेच मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यांना या क्षेत्रात बऱ्याच वर्षांचा अनुभव असून त्यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात आपल्या शालेय जीवनापासून केली होती. ‘ श्री. विनायक गवस’ यांनी इयत्ता ४ थी व ५ वी च्या विद्यार्थ्यांना डिजिटल मिडिया व प्रिंट मिडिया याविषयी मार्गदर्शन केले. व लाईव्ह न्यूज मध्ये त्वरित बातम्या कशा उपलब्ध होतात, तसेच वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या बातम्या एक दिवस अगोदर पोहोचतात व त्यावर वेगवेगळ्या विभागाकडून कशी प्रक्रिया केली जाते व शेवटी ती बातमी प्रिंटिंग विभागाकडे कशी पोहोचते, ही संपूर्ण प्रक्रिया त्यांनी विद्यार्थ्यांना विशद केली. या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. तसेच जर या क्षेत्रात यायचे असेल तर या वयापासूनच अभ्यासू वृत्ती ठेवून चौकस रहाणे व मिळालेल्या संधीचा लाभ करून घेणे या विषयी माहिती दिली. तसेच,या क्षेत्रात ते कसे रुजु झाले व या क्षेत्रामध्ये त्यांना कशाप्रकारे यश प्राप्त झाले हे त्यांनी स्वतःचे अनुभव मांडले. तसेच दिवसभरात त्यांच्याकडे पोहोचणाऱ्या अनेक बातम्यांपैकी सर्वात महत्त्वाची बातमी पहिल्या पानावर छापली जाते व इतर सर्व बातम्यांचा क्रम प्राथमिकतेनुसार वर्तमापत्राच्या इतर पानांवर छापल्या जातात. या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे, विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शंका पत्रकरांपुढे मांडल्या व त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले. त्यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय सहा. शिक्षिका सौ. जरीन शेख यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. प्राची साळगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सौ. सुषमा पालव व सौ. शीला चव्हाण यांनी केले. व शाळेचे संचालक श्री.रुजुल पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा