वैभववाडी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने दि.१५ ऑगस्ट रोजी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई शाखा सिंधुदुर्ग यांच्या पुढाकाराने आणि समाज कल्याण विभाग व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने “चला व्यसनमुक्तीची शपथ घेऊया” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट,२०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांनी ध्वजवंदन कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन या उपक्रमात सहभागी नोंदवावा असे आवाहन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई शाखा सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
वैभववाडी तालुक्यासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांनी शपथ देतानाचा फोटो किंवा व्हिडिओ करुन ९४२०२६१२९६ या नंबरवर पाठवून दिल्यास सर्व सहभागी शाळा, महाविद्यालयांना नशाबंदी मंडळाकडून ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी व्यसनमुक्तीची शपथ देण्याच्या उपक्रमात सहभागी होऊन व्यसनमुक्तीच्या प्रबोधन कार्यास सहकार्य करावे असे आवाहन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने संघटक श्रीम.अर्पिता मुंबईकर, सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील (९८३४९८४४११) यांनी केले आहे.