*सावंतवाडी अर्बन बँक*
*फोंडाघाट शाखेसमोर माजी संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचा उपोषणाचा इशारा*
फोंडाघाट
सावंतवाडी अर्बन बैंक लिक्विडेशनमध्ये गेल्याने फोंडाघाट शाखेसमोर १६ ऑगस्टला उपोषणाचा इशारा माजी संचालक अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.
आपल्या बँकेच्या जिल्ह्यातील सर्व शाखा सुरु असून यामध्ये आर्थिक व्यवहार बंद आहेत. शेती काम, व्यावसायिक देणी-घेणी आणि प्रापंचिक अडचणी याकरिता लोकांना लागणारी पैशाची गरज त्यांचे पैसे बँक खात्यावर असूनही त्यांना मिळत नाहीत. तसेच तोंडावर चतुर्थी सण आलेला आहे. व्यापार उदिमसाठी पैश्याची गरज असूनही लोकांना पैसे मिळत नसल्याने निराश व्हावे लागत आहे.
आपण माजी संचालक असून लोक मला विचारतात, त्यांना मी काय उत्तर देणार? परंतु लोकांसाठी त्यांच्या गरजा भागविण्यासाठी सूवर्णमध्य काढून लोकांना चतुर्थीपूर्वी त्यांचे पैसे देण्याचे नियोजन व्हावे यासाठी आपण १६ ऑगस्टला फोंडाघाट येथील सावंतवाडी अर्बन बँक शाखेसमोर उपोषण करणार आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास आपण जबाबदार राहाल. तत्पूर्वी आपण मार्ग काढावा असा इशारा अजित नाडकर्णी यांनी दिला आहे.
श्री. बबन पवार, श्री. नागेश लिंग्रस, श्री. वैभव नाईक, श्री. श्रीकृष्ण चोरगे, श्री. दिगंबर हाऊळ, चोरगे कुटुंबिय, डी.के. गृप, श्री. रंजन नेरुरकर, श्री. अविनाश सापळे, श्री. संदेश पारकर, श्री. आनंद मर्ये, श्री. सुर्यकांत तेली,
पोकळे कुटुंबिय, एम.बी.सी गृप, श्री. कुमार नाडकर्णी, श्री. टक्के परिवार, पटेल परिवार, श्री. अविन मर्ये, श्री. जामदार, आपटे कुटुंबिय,
श्री. अनिल बांदिवडेकर, श्री. बाळाशेठ भोगले, श्री. बबन भोगले, श्री. साईल पावसकर, तायशेटे कुटुंबिय, सवंगडी गृ जणप आधी मी अजित नाडकर्णी यांना पाठिंबा दर्शविला आहे.