पत्रकार रुपेश पवार यांना ‘स्टार साहित्यिक पुरस्कार’ जाहीर
मुंबईतील सर्वद फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचा
‘स्टार साहित्यिक पुरस्कार’ (२०२३) ठाण्यातील साहित्यिक, पत्रकार एडवोकेट रुपेश पवार यांना जाहीर झाला आहे. सर्वद फाउंडेशनच्या निवड समितीने, सिद्धहस्त लेखन कार्याबद्दल रुपेश पवार यांची निवड केली आहे. हा कार्यक्रम पुढील महिन्यात शनिवार दि. २८ ऑगस्टला (२०२३) अभय इंटरनॅटशनल स्कूल डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, बी विंग, कन्नमवार नगर १, विक्रोळी पूर्व या ठिकाणी दूपारी ०२.३० वाजता आयोजित केला गेला आहे. त्या कार्यक्रमात पवार यांना तो पुरस्कार प्रदान केला जाईल.
रुपेश पवार हे बहुविकलांग कॅटेगिरीतील दिव्यांग असून, त्यांनी आपल्या शारीरिक तथा दृष्टीदोषावर मात करत, लेखन करत असतानाच्या अडचणी झेलत, अतिशय कष्टाने आपल्या लेखनात कौशल्य निर्माण केले आणि वाचकांचे निरनिराळ्या विषयातून प्रबोधन केले. त्यातून त्यांची चार मुद्रित (प्रिंटेड) पुस्तके व पाच ई बुक माध्यमातील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. रुपेश पवार यांच्या वलयांकित या पुस्तकावर अभिवाचनाचा कार्यक्रम होत असतो. त्याचप्रमाणे रेडिओ विश्वास नाशिक या कम्युनिटी रेडिओवर संवादिका सौ मयुरी कदम, रुपेश पवार यांच्या विविध विषयांवरच्या लेखांवर अभिवाचन करत असतात. पवार यांनी साहित्यिक कार्यक्रमाचे संचलन व निवेदन केले आहे. त्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. ते गेल्या २२ वर्षापासून ठाण्यातील दैनिक ठाणे वैभव या वृत्तपत्र स्तंभलेखक, मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. ते सहा वर्षापासून चित्रपट लेखनही करत आहेत. त्यांनी 25 हून अधिक गीतांचे लेखनही केले आहे. या बावीस वर्षात त्यांना अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे. अनेक मान्यवरांचे त्यांना आशीर्वाद त्यांना लाभले आहेत. रुपेश पवार हे नूतन गुळगुळे फाउंडेशन या दिव्यांग संस्थेचे ठाणे समिती प्रतिनिधी आहेत.
या सर्व साहित्य प्रवासाचा आढावा घेऊन सर्वद फाउंडेशनने ही निवड केली आहे. सर्वद फाउंडेशन ही सेवाभावी संस्था वंचित, अनाथ मुलांकरता, निराधार महिलांकरता, अपंग, वृद्ध नागरिकांकरता बहुमूल्य कार्य करत आहेत. त्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेच्या सामाजिक कार्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे. त्याकरता आपण रुपेश पवार यांच्याशी संपर्क साधला तरी चालेल.
प्रा. पुनम नलावडे
लेखिका
*संवाद मिडिया*
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
*Advt link*
https://sanwadmedia.com/104937/
————————————————