You are currently viewing युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने शाळा तरंदळे नंबर एक मध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने शाळा तरंदळे नंबर एक मध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

कणकवली

शाळा तरंदळे नंबर एक येथे आज मंगळवार दिनांक 01.08.2023 रोजी सकाळी 11 वाजता युवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने जिल्हा परिषद माजी अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष,युवा संदेश प्रतिष्ठान चे अध्यक्ष सन्माननीय श्री.संदेश उर्फ गोट्या सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून करण्यात आला.त्यानंतर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत साहेब यांचं स्वागत सरपंच सुशिल कदम यांनी केलं,सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप सावंत यांचं स्वागत माजी सरपंच श्री सुधीर सावंत यांनी केले,सामाजिक कार्यकर्ते श्री राजू हिरलेकर यांचं स्वागत माजी सरपंच श्री राजेश फाटक यांनी केलं.तरंदळे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री.रमाकांत देवलकर यांचं स्वागत माजी उपसरपंच संदेश सावंत यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक तळदेवकर सर यांनी केलं.सरपंच श्री.सुशिल कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संदेश उर्फ गोट्या सावंत साहेब,संदीप सावंत,राजू हिर्लेकर,सुधीर सावंत,राजेश फाटक,रमाकांत देवलकर,शिक्षक वर्ग यांचे स्वागत ही केले व आभार ही मानले.सरपंच सुशिल कदम म्हणाले सावंत साहेब यांचं शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण काम आहे.महाराष्ट्र मध्ये युवा संदेश च नाव त्यांच्या कामगिरीवर गाजतय.युवा संदेश चे अनेक उपक्रम हे प्रेरणा देणारे असतात.मुलांना घडविणारे असतात.सावंत साहेबांच्या अथक परिश्रमा मुळेच शाळा नंबर एक च काम दर्जेदार करता आले.आणि ह्याच आम्हाला सर्वांना अभिमान असेल.सन्माननीय श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आपल्या भाषणात म्हणाले की युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित अनेक उपक्रम राबविले जातात,आणि ह्या पुढेही अधिक गतीने अनेक उपक्रम राबविले जातील.मुलांना 10 वी 12 वी नंतर काय करावे हा प्रश्न पडतो त्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन युवा संदेश प्रतिष्ठान वतीने केले जाते.मुलांनी मेहनत केली,पालक वर्गाने आपल्या मुलानं कडे लक्ष दिले तर नक्कीच अधिकारी,ऑफिसर बनू शकतात,फक्त करण्याची इच्छा जिद्द गरजेची आहे.युवा संदेश प्रतिष्ठान वतीने वेगवेगळे उपक्रम होत असतात त्यामध्ये मुलांना सहभागी करण्यासाठी आव्हान केलं.मोफत वह्या वाटप कार्यक्रमासाठी संदेश सावंत साहेब,संदीप सावंत,राजू हीर्लेकर,सरपंच सुशिल कदम, माजी सरपंच सुधीर सावंत, माजी सरपंच राजेश फाटक,माजी उपसरपंच संदेश सावंत,माजी ग्रामपंचायत सदस्य देवा रावले,सदस्य सूनीलदत्त जाधव,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष रमाकांत देवलकर,गणेश मुंबरकर,मुख्याध्यापक पोखळे सर, तळदेवकर सर,डोईफोडे सर,कांबळी सर,अंगणवाडी शिक्षिका शितल सावंत मॅडम व पालकवर्ग मुले उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा