You are currently viewing कणकवली तालुका कॉंग्रेस च्या वतीने संभाजी भिडे यांना जोडे मारो आंदोलन.

कणकवली तालुका कॉंग्रेस च्या वतीने संभाजी भिडे यांना जोडे मारो आंदोलन.

कणकवली

महात्मा गांधी, महात्मा फुले इत्यादी सह महाराष्ट्रातील इतर महापुरुषांबद्दल सतत अपशब्द वापरून त्यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांचा विरोधात आज कणकवली तालुका काँग्रेस च्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले व भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या वक्त्यावांचा निषेध करण्यात आला.
यावेळी काँग्रेस कर्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा धिक्कार असो, या संभाजी भिडेचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा दिल्या. यानंतर सर्व पधादिकारी व कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्थानकात जाऊन महात्मा गांधीजी यांचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा नोदवून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करून तसे निवेदन सादर केले.


यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, तालुका सरचिटणीस महेश तेली ,तालुका उपाध्यक्ष निलेश मालडंकर ,महिला तालुका उपाध्यक्ष आयशा सय्यद जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर,अमित मांडवकर, शहराध्यक्ष अजून मोरये , प्रदीप कुमार जाधव, संदीप कदम ,आनंद नाईक, राजू वर्णे व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − five =