वैभववाडी :
वैभववाडी करूळ घाटाच्या प्रश्ना संदर्भात आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या समवेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. तरेळे ते गगनबावडा असा मंजूर झालेला करून घाट रस्ता आणि त्या रस्त्याची सद्यस्थितीत झालेली दुरावस्था. मंजूर असलेल्या टेंडरची वस्तुस्थिती आमदार नितेश राणे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना या घाट रस्त्या संदर्भात योग्य त्या सूचना देऊन अपेक्षित कारवाई केली जाईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
करूळ घाटाचा मुद्दा रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे गेले कित्येक दिवस चर्चिला जात आहे. मात्र 40% बिलो असलेले टेंडर रस्त्याचा दर्जा टिकवू शकत नाही. त्यामुळे भविष्यात घाट मार्गाने प्रवास करणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागणार आहे.याबाबतची वस्तुस्थिती आमदार निदेश राणे यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर योग्य ते प्रक्रिया करण्याच्या आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिल्या आहे.यावेळी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा या घाट रस्त्याच्या संदर्भात चर्चा केली.