You are currently viewing व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल सावंतवाडी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम..

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल सावंतवाडी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम..

सावंतवाडी

व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल, सावंतवाडी महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल सावंतवाडी येथील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाचा ९५% निकाल लावून नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चे बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमाचे निकाल डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अंतिम वर्षात नेहा तंबिटकर (८८, ०३) प्रथम, समीक्षा पवार (८२.०८) व विनायक पडये (८२.०८) द्वितीय तर क्रांती गावकर (८२.०१) व धनश्री परब (८२.०१) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्याबद्दल महाविद्यालयाचे तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री. पंकज पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे, तसेच महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचे प्रमुख कु. मनाली वैद्य यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा