ओटवणे
ओटवणे गावातली विजेच्या समस्येबाबत आज ओटवणे ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जात जाब विचारला. सध्या ओटवणेला बांदा येथून वीज सप्लाय होतो मात्र या भागातून वारंवार जाणारी वीज यासाठी गेली दहा वर्षे सावंतवाडी मधून वीज मिळावी ही ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार कामालाही सुरु झाली आणि हे काम गेले वर्षभर बंद फक्त पोल उभे केले असुन याबाबतही जाब विचारला या ही विषयी समर्पक उत्तरे ग्रामस्थांना मिळाली नाही त्यामूळे ग्रामस्थांनीही आक्रमक पवित्रा घेतला. भडकलेल्या ग्रामस्थांनी ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या आणि पोल साठी वनखात्याकडे पोल उभारण्याची आणि काम चालू करण्यासाठी मागणीच केली नाही असा अधिकाऱ्यांवरच आरोप करत संताप व्यक्त केला. यावेळी सावंतवाडी वीज वितरणाचे उप कार्यकारी अभियंता कुमार चव्हाण , सहाय्यक अभियंता परब, कनिष्ठ अभियंता आर. आर. मोरे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी ओटवणे उपसरपंच संतोष कासकर, उमेश म्हापसेकर, सगुण गावकर, जयगनेश गावकर, संतोष भैरवकर, संतोष तावडे, अमेय गावडे, विनायक वरनेकर, नीलेश माटेकर, पंकज गावकर, रामदास गावकर, अनंत तावडे, पंकज गावकर, सत्यवान गावकर, स्वप्नील म्हापसेकर, प्रमोद केळुस्कर, किरण गावकर,ज्ञानेश्वर गावकर, अमित गावकर, रवींद्र गावकर, ओमकार गावकर, रामदास गावकर,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.