You are currently viewing पुरावे देतो, राजकीय संन्यास कधी घेता ते जाहीर करा

पुरावे देतो, राजकीय संन्यास कधी घेता ते जाहीर करा

पुरावे देतो, राजकीय संन्यास कधी घेता ते जाहीर करा

राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष नयन गावडेंचे नरेश गुरव याना प्रतिआव्हान

मनोज रावराणेंमुळे नवीन कुर्ली वसाहत गावात फूट

कणकवली : नवीन कुर्ली वसाहत गावच्या स्वतंत्र ग्रामपंचायत ला तुळशीदास रावराणे यांनी विरोध केल्याचा पुरावा आमचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर देतीलच. मात्र त्यानंतर जाहीर केल्यानुसार तुळशीदास रावराणे राजकीय संन्यास घेणार काय ? हे आधी आपल्या मालकाला विचारून ठेवा. तुळशीदास रावराणेंचा घरगडी असलेल्या नरेश गुरव यांना स्वतःला रावराणेंकडून काही वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा विसर पडला असेल. आम्ही पुरावे देतोच तुमचा मालक राजकीय संन्यास घेणार काय हे आधी मालकाला विचारा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली युवक तालुकाध्यक्ष नयन गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून लगावला आहे. गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की नवीन कुर्ली वसाहत गावात फूट पाडण्याचे काम मनोज रावराणे यांनी केले. त्यामुळेच मनोज रावराणेंच्या विरोधात स्थानिक मंडळाने ठरावही घेतला.नवीन कुर्ली वसाहतमधील जलजीवन मिशन नळपाणी योजनेचे कामही मनोज रावराणेंनी करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.नरेश गुरव यांची अनंत पिळणकर यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर हे नवीन कुर्ली वसाहत विकास समितीचे मागील 14 वर्षे अध्यक्ष म्हणून गाव विकासासाठी झटत आहेत.नवीन कुर्ली वसाहत गावची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी यासाठी तालुका जिल्हा आणि आयुक्त प्रशासन पातळीवर आणि ग्रामविकास मंत्र्यांपर्यंत त्यानी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे नवीन कुर्ली वसाहत गावाची अर्धवट माहिती असणाऱ्या नरेश गुरव यांनी त्यांच्या मालकाने नवीन कुर्ली वसाहत च्या स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीला विरोध केल्याचा पुरावा सादर केल्यानंतर नरेश गुरव यांचा मालक असलेले तुळशीदास रावराणे राजकीय संन्यास कधी घेणार हे जाहीर करावे असे प्रतिआव्हान नयन गावडे यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा