You are currently viewing नवीन कुर्ली ग्रामपंचायतच्या परिपूर्ण प्रस्तावासाठी आमचा पाठपुरावा – नवीन कुर्ली विकास समिती चे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर

नवीन कुर्ली ग्रामपंचायतच्या परिपूर्ण प्रस्तावासाठी आमचा पाठपुरावा – नवीन कुर्ली विकास समिती चे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर

शिंदे गटाच्या आग्रे आणि हरिष पाटील ची बनवाबनवी उघड

मनोज रावराणेंनी स्वतंत्र ग्रामपंचायतच्या विरोधात केला होता पत्रव्यवहार

कणकवली

काही दिवसांपूर्वीच नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर झाल्याची फसवी माहिती देत गावात मिरवणूक काढून बॅनरबाजी करणाऱ्या शिंदे गटाच्या आग्रे आणि हरिष पाटील यांचा खोटेपणा उघड झाला असून अद्याप स्वतंत्र ग्रामपंचायत चा आदेशच झाला नसल्याचे आमदार नितेश राणेंनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या घेतलेल्या भेटीत उघड झाले आहे. नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायतला विरोध करण्यासाठी मनोज रावराणे, त्यांचे वडील तुळशीदास रावराणे यांनीच प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता .आता दिखाऊपणा करण्यासाठी मनोज रावराणे फोटोसेशन करत असल्याची आणि शिंदे गटाचा खोटेपणा उघड झाल्याची टीका नवीन कुर्ली विकास समिती चे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली. प्रसिद्धीपत्रकात पिळणकर यांनी म्हटले आहे की स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी यासाठी मागील 13 वर्षे मी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. 1 मे 2023 रोजी मी यासाठी उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी मला 24 एप्रिल2023 रोजी उपोषणाला न बसण्याबाबत विनंतीपत्र दिले. ज्या पत्रात 9 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामपंचायत निर्मिती बाबत च्या त्रुटी पूर्तता करून जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे पाठवण्यात आला आणि 9 मार्च रोजी हा प्रस्ताव कोकण आयुक्तांकडून ग्रामविकास विभागाला पाठवण्यात आला. एकीकडे सत्ताधारी असलेले शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे आणि हरिष पाटील हे नवीन कुर्ली वसाहत साठी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजूर करून घेतल्याचे भासवून आपल्या फसव्या पुढारी पणाचे ढोल पिटत असतानाच दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी काल 28 जुलै रोजी विधानभवनात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. अद्याप नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरी चा आदेश ग्रामविकास विभागाने काढलेला नाही, परिपूर्ण प्रस्ताव सादर झालेला आहे.तरी स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुरीचा आदेश काढण्यासाठी मागणी चे निवेदन दिले.आमदार नितेश राणेंच्या या पाठपुराव्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र या भेटीवेळी उपस्थित असलेले मनोज रावराणे यांनीच स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीत खोडा घातला. जिल्हा प्रशासनाकडे नवीन कुर्ली वसाहत ची स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यास विरोध करणारी पत्रे प्रशासनाला दिली असून मनोज रावराणे हे स्वतःची डॅमेज इमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका पिळणकर यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा