You are currently viewing फोंडाघाट मध्ये अतिवृष्टीमुळे नाडकर्णी कुटुंबाची 15 एकर भात शेती पाण्याखाली

फोंडाघाट मध्ये अतिवृष्टीमुळे नाडकर्णी कुटुंबाची 15 एकर भात शेती पाण्याखाली

नुकसानग्रस्तांनी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधण्याचे अजित नाडकर्णी यांनी केले आवाहन

फोंडाघाट

यावर्षी अतिवृष्टीमुळे फोंडाघाट मधील नाडकर्णी कुटुंबाची 15 एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे. अजित नाडकर्णी यांनी झालेल्या नुकसानीचे तलाठी मॅडमना पंचनामे करण्यास विनंती केली आहे. फोंडाघाट मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या झालेल्या नुकसानीची नोंद तहसील कार्यालयामध्ये संपर्क करून करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केले आहे. झालेल्या नोंदीप्रमाणे नुकसानीचे पंचनामे तलाठी मॅडम करणार आहेत. त्याच प्रमाणे आपल्या जमीनीत आॅनलाईन पीक पाणी लावुन घेण्याचे आवाहनही अजित नाडकर्णी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा