कुडाळ
कुडाळ तालुक्यातील शिवापूर कोटीवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ (वय ४८) हा युवक शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह आज गुरवार (दि.२७) सकाळी वाहून गेलेल्या ठिकाणापासून दिड किलोमीटर अंतरावर सापडला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील , भाऊ असा परिवार आहे.
शिवापूर कोटीवाडी येथील तुकाराम राऊळ हे दरदिवशीप्रमाणे बुधवारी सकाळी आपली गुरे घेऊन शिवापूर गाव्हाळ भागात (कर्ली नदीकाठी) गेले होते. दुपारचा जेवनाचा डबा सोबत नेला असल्याने ते एकदम सायंकाळी गुरांसह घरी परतत होते, मात्र बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यांची गुरे उशिरा घरी परतली. यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांचा शोध घेतला. पण ते कोठेही सापडले नाहीत. स्थानिक ग्रामस्थांना ही माहिती समजतात त्यांनीही तुकाराम यांचा शिवापूर गाव्हाळ भागात कर्ली नदी किनारी शोध घेतला. पाऊस मोठा असल्यामुळे नदीपात्रानजिक शोध घेणे कठीण होते. आज सकाळी शिवापूर गावातील ग्रामस्थांनी पुन्हा शोध सुरु केला असता नदीपात्रानजिक रेनकोट सापडून आला. त्यापुढे दीड किलोमीटर अंतरावर बंधाऱ्याला त्यांचा मृतदेह अडकलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती माजी उपसरपंच वकील सुधीर राऊळ,उप सरपंच महेंद्र राऊळ यांनी पोलीस आणि तहसीलदार कुडाळ याना दिली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले.