*आज शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समारोपीय समारंभ…..*
अमरावती
आज २८ जुलै२०२३. अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा म्हणजे आमच्या विदर्भ महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम. या आधी शुभारंभ कार्यक्रम या वर्षात तीन दिवस संपन्न झाला .दि १०,११ व १२ एप्रील २०२३ ह्या त्या तारखा.मी ९ एप्रीललाच विदर्भ महाविद्यालयात दाखल झालो होतो .मी माझ्या मागील सर्व कामधंदे सोडून चार दिवस या आनंद उत्सवात सहभागी झालो .हे चार दिवस कसे गेले ते कळलेच नाही. तेव्हा सर्वांना निरोप देऊन मी गुजरातकडे निघुन गेलो.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मा.श्री. वसंतराव देशमुख आय पी एस यांनी त्यांच्याकडे आलेले महोत्सवाचे निमंत्रण माझ्याकडे पाठविले होते व त्यानुसार माझे नियोजन सुरू झाले. मी विदर्भ महाविद्यालयामध्ये दोन वर्ष एम ए मराठी करण्यासाठी शिकलो आहे.,१९७४,७५ व १९७५ -७६ ही ती दोन वर्षे .मित्र येणार मैत्रिणी येणार प्राध्यापक भेटणार त्यामुळे मनात एक आनंदाचे वातावरण तयार झाले होते .मी माझ्या कार चालकाला छायाचित्रकारांना तसेच माझ्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या . ९ एप्रिल ला आम्ही विदर्भ महाविद्यालयात पोहोचून महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख यांची भेट घेतली व त्यांना आम्ही शताब्दी शुभारंभ कार्यक्रमात आमचा सहभाग दर्शविला. अंजलीताईंनी मनापासून स्वागत केले आणि आम्ही एक दिवस आधीच आल्यामुळे त्यांना तर खूपच आनंद झाला. महाविद्यालयात संचालक कक्षातून आम्ही बाहेर पडलो व जिथे मुख्य सभामंडप उभारण्यात येत होता त्या दिशेने निघालो .सुस्वागतमचे भव्य स्वागत गेट स्वागत करायला आतुर झाले होते .मंडपाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले होते .पावसाळी वातावरण असल्यामुळे सौ अंजलीताईंनी पुढाकार घेऊन ताडपत्रीचा दणकट मंडप तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या .परिसरात चक्कर मारल्यानंतर आम्ही विदर्भ महाविद्यालयातील आय ए एस केंद्राकडे वळलो. तिथल्या संचालिका प्रा.डा.संगीता यावले मॅडम यांनी आमचे स्वागत केले आणि ताबडतोब तत्परतेने आम्हाला चहा पाजला .आयएएस सेंटर कसे तयार झाले याचा इतिहास त्यांनी आम्हाला अवगत केला .आम्ही नवीन तयार झालेले जवळपास वीस कोटी रुपयांचे आयएएस सेंटर पाहून थक्क झालो .असे आयएएस सेंटर आजच्या घटकेला तरी महाराष्ट्रात कुठेच नाही आहे.अतिशय अप्रतिम देखणे हे केंद्र चार एकराच्या परिसरात उभे झाले आहे .विदर्भ महाविद्यालयाच्या शताब्दी वर्षात अमरावतीला मिळालेली ही अपूर्व अशी देणगी आहे. लगेच मी माझे विदर्भ महाविद्यालय हा लेख लिहून वर्तमानपत्रांना पाठविला .दिनांक ९ एप्रील रात्री १२ वाजताची वेळ असेल .किंचित पाऊस सुरू झाला .विजांच्या कडकडात पाहिल्यानंतर तर मुसळधार पाऊस येणार असे संकेत मिळत होते .परंतु या शताब्दी महोत्सवावर निसर्गाने कृपा केली आणि चारही दिवस पावसाने पडता पाय काढला .
पहिला कार्यक्रम झाला तो उद्घाटनाचा .अतिशय उत्साही स्वरुपात हा कार्यक्रम झाला .महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे उद्घाटनाला आले होते .आणि कारणही त्याला तसेच होते .त्यांच्या मातोश्री याच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत .त्या या समारोहाला आपल्या मैत्रिणींसह येणार होत्या .देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री ह्या विदर्भ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत ही बाब संस्थेच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख यांना आ.प्रा. बी टी देशमुखांकडून समजली आणि सुत्रे फिरली . उपमुख्यमंत्र्यांच्या आईलाही आनंद झाला .आई आणि चिरंजीव एकाच शताब्दी महोत्सवात. खरं म्हणजे सुवर्णयोगच म्हणावा लागेल .उपमुख्यमंत्र्यांनी नुसते शताब्दी वर्षाचे उद्घाटनच केले नाही तर या महाविद्यालयासाठी जे जे करता येण्यासारखे आहे ते ते सर्व करण्याची तयारी दर्शविली. याशिवाय २५ कोटी रुपयाची भरीव देणागी देखील त्यांनी याप्रसंगी जाहीर केली .उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय देखणा झाला. प्रचंड उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा प्रचंड जल्लोष यामुळे या कार्यक्रमाला चार चान्द लागले .या कार्यक्रमाला अनेक माजी प्राचार्य, प्राध्यापक,विद्यार्थी विद्यार्थिनी आणि कर्मचारी बहुसंख्येने आले होते .प्राध्यापक बी टी देशमुख व प्राचार्य प.सि.काणे हे पहिल्याच लाईनमध्ये बसले होते. मी त्यांची जाऊन भेट घेतली .त्यांच्यावर लेख लिहिल्याचे सांगितले व तिथेच त्यांचे फोटो काढून ते वर्तमानपत्रांना पाठवले .सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी रंग भरला .सुधीर मोहोड आणि मुक्ता महल्ले यांनी कार्यक्रमाची सूत्र हाती घेतली. आणि एक एक कलावंत स्टेजवर बोलावून त्यांना त्यांची कला सादर करण्याची विनंती केली.
मुंबई पुणे नागपूर अशा दुरून दुरून येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भरीव असे योगदान दिले .या सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन मंडळाच्या संचालिका डॉ.अंजली देशमुख यांनी गौरव केला .माझा देखील स्मृतिचिन्ह देऊन त्यांनी सत्कार केला. आलेल्या सर्व मान्यवरांना स्नेहभोजन देखील गृहशास्त्र विभागात आयोजित करून आपल्या आदरतिथ्याचा परिचयही करून दिला. मित्र भेटत होते .प्राध्यापकांचीही संख्या चांगली होती .आम्हालाही आमचे ते दिवस आठवत होते. आज आम्ही सत्तरी गाठली तरी हे चार दिवस मात्र आमचे गद्देपंचविशीतच गेले .दुसरा दिवस होता माजी विद्यार्थ्यांचा मेळावा .या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये प्रवेशद्वारावर मीच पुढाकार घेऊन उभा झालो .येणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मी स्वागत तर केलेच .पण प्रत्येकाचा आवर्जून माझ्या छायाचित्रकाराला सांगून आमच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या बॅनर जवळ फोटो काढला. याच ठिकाणी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे नोंदणी करण्यासाठी एक बूथ उभारण्यात आला होता.माजी विद्यार्थी आपले नाव नोंदवित होते .या माजी विद्यार्थी मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ९२ वर्षाचे प्राचार्य प.सि.काणे यांनी उभे राहून भाषण दिले आणि त्यांचे शिष्योत्तम प्रा.बी.टी. देशमुख यांनी माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले की आपण सर्वजण एकत्र येऊन माजी विद्यार्थी संघटनेतर्फे महाविद्यालयाला एक सभागृह बांधून देऊ या आणि आपला खारीचा वाटा म्हणून त्यांनी याप्रसंगी आपली पहिली देणगीही घोषित केली. माजी विद्यार्थी मेळाव्याला दुरून दुरून लोक आले होते. माझ्याबरोबर शिकत असलेले प्रा. सुभाष गढीकर,दिनकर तानकर, मीनाताई ठाकरे अनुराधाताई वराडे,उपजिल्हाधिकारी वर्षाताई भाकरे वसंत घुईखेडकर,प्राचार्य संतोष ठाकरे माजी कुलगुरू के एम कुलकर्णी, प्रा.दि व्य जहागीरदार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री वसंत राव देशमुख,वीर चक्र प्राप्त कमांडो श्री देऊस्कर. मुक्ता जहागीरदार ,माजी संचालक प्रा.प्रभाताई भोगावकर प्रा. विजया डबीर, प्रभा गणोरकर अशी कितीतरी मंडळी भेटत होती .गप्पा होत होत्या .गृहशास्त्र विभागामध्ये चहापाण्याबरोबरच गप्पांची मैफल झडत होती .आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मी माझे गाजलेले स्पर्धा परीक्षेची एबीसीडी हे शंभर रुपयाचे पुस्तक सर्वांना विनामूल्य वितरित केले .गृहशास्त्रातील अल्पोपहार चहापान ऑटोपल्यानंतर आम्ही सर्वांनी महाविद्यालयाच्या पोर्चजवळ एक सामायिक फोटो काढला .खरं म्हणजे हा फोटो जम्बो फोटो काढायला पाहिजे होता .पण आनंदाला इतके उधाण आले होते की सभा मंडपात भव्य स्टेजवर सामूहिक फोटो काढण्याचा आम्हाला विसर पडला .दिनांक १२एप्रिल हा या शताब्दी महोत्सवाचा शेवटचा दिवस. त्यासाठी पाहुणे म्हणून निमंत्रित होते. अकोल्याचे सुप्रसिद्ध वक्ते श्री सचिन बुरघाटे .मी बरोबर वेळेवर संचालकाच्या केबिनमध्ये पोहोचलो .कार्यक्रमाची वेळ होईपर्यंत संचालिका डॉ. अंजली देशमुख सचिन बुरघाटे मी वासनकर सर गजानन पोरे,बाबुराव वानखडे, चौधरी सर, ठाकरे सर सर्व पुढील शताब्दी सांगता कार्यक्रमाची चर्चा केली .काही सूचना आल्या ..त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरविले . पोरांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठरलेले होते .विदर्भ महाविद्यालयाचा हा सभा मंडप अक्षरशः जिवंत झाल्यासारखा वाटत होता .महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी चांगले नटून थटून आले होते आणि प्रत्येक जण आपापली कला सादर करीत होते .कार्यक्रम रंगत होता. पुढे रंगत गेला. आणि विदर्भ महाविद्यालयातील माजी विद्यार्थी तर या समारोहामुळे रोमांचित झालेले आहेत .आम्ही दिनांक बाराला दुपारी चार वाजता कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदर्भ महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख यांची भेट घेतली .माझ्याबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री वसंतराव देशमुख हे होते .शताब्दी समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये निघणाऱ्या स्मरणिकेवर चर्चा झाली .जे जे नामवंत सुटले त्यांना आवर्जून निमंत्रण देऊन आणण्यावरही नियोजन झाले .आम्ही वसंतराव देशमुख सर यांना सोडायला रेल्वे स्टेशनकडे वळलो .सरांनी आठवणीने चिवायिची दीड किलो भाजी सोबत नेली .त्यांच्या मुंबईला ते मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हे चार दिवस कसे गेले कळलेच नाही. कन्या सासुरासी जाये मागे परतून पाहे या न्यायाने आम्ही या महाविद्यालयाकडे पाहत होतो पाहत राहणार आहोत आणि पाहणारी आहोत .मी मात्र आठवणीने माझ्या खारीचा वाटा उचलला आणि महाविद्यालयाला एक स्पर्धा परीक्षांचा १२ कार्यक्रमांचा आयोजनाचा संकल्प देखील जाहीर केला. या चार दिवसात लोकांना सभा मंडपात आणणे .त्यांना घरी सोडून देणे. त्यांना चहापाणी करणे व काही जणांची भोजनाची व्यवस्था करणे याबाबतीत मला जेवढा पुढाकार घेता आला तेवढा मी घेतला आणि माझा खारीचा वाटा उचलला. प्रत्येकाने जर असा आपला खारीचा वाटा उचलला तर मला असं वाटते की विदर्भ महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गजबजल्याशिवाय राहणार नाही .आम्ही थोडाफार भार उचलला .पण या शताब्दी शुभारंभ महोत्सवासाठी संचालक प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी स्वयंसेवक यांना किती मेहनत करावी लागली असेल.? हा एवढा मोठा डोलारा उभे करणे निश्चितच सोपे काम नाही .त्यात पाऊस केव्हा येईल याचा भरोसा नव्हता.या सगळ्या वातावरणातही हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला .आपला खारीचा वाटा उचलला .त्या सर्वांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात आणि जे माजी विद्यार्थी आले नाहीत त्यांना मी आवर्जून सांगतो की ते एका फार मोठ्या संधीला मुकले आहेत. ते आज २८जुलैला शताब्दी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात नक्कीच हजर असतील. समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी येणार आहेत. त्यानिमित्ताने तरी आपण एकत्र आले पाहिजे आणि महाविद्यालयाने आपल्याला भरपूर काही दिलेले आहे. किमान आपली उपस्थिती दर्शवून आपल्या आयुष्याची पाच दहा वर्ष वाढवून घेतली पाहिजे. त्या चार दिवसात मला माझ्या सत्तरीचा विसर पडला. माझा उत्साह पाहून अनेकांनी माझे अभिनंदन केले .माझ्या फोटोग्राफरने जवळपास एक हजारच्या वर फोटो काढले .प्रत्येक प्राध्यापकाला प्रत्येक माजी विद्यार्थ्याला मी त्यांचे त्यांचे फोटो पाठविण्याचे कबूल केले व पाठवले देखील. याचा त्यांना किती आनंद झाला आणि हा आनंद मला स्वतःला द्विगुणीत करून गेला. विदर्भ महाविद्यालयाने आम्हाला याही वयात तरुण केले आणि शताब्दी महोत्सवाची सांगता होईपर्यंत आम्ही तरुणच राहणार आहोत व पुढेही महाविद्यालयाच्या जडणघडणी साठी कार्यतत्पर राहू..या महाविद्यालयासाठी आमचा खारीचा वाटा उचलणार आहोत .आमच्या या ज्ञानयज्ञांमध्ये आमचे सर्व माजी विद्यार्थी सहभागी होतील .आणि साथी हाथ बढाना एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना या न्यायाने संचालिका मॅडमला तसेच यानिमित्त स्थापन झालेल्या विदर्भ महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेला आपली उपस्थिती दर्शवून आपला सहभाग नोंदवतील अशी अपेक्षा आहे. या भव्य समारोपीय कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नाही याची मला खंत आहे कारण गेल्या आठ दिवसापासून मी दिल्ली येथे तळ ठोकून आहे. सनदी अधिकारी मा.ज्ञानेश्वर मुळे साहेब यांनी नवीन यू पी एस सी पास झालेल्या ७७ मुलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. आज तो कार्यक्रम दिल्ली येथे आहे.व माझी हजेरी त्या कार्यक्रमाला आहे.
==============
प्रा *.डॉ.नरेशचंद्र काठोळे* माजी विद्यार्थी विदर्भ महाविद्यालय व संचालक मिशन आयएएस जिजाऊ नगर विद्यापीठ रोड अमरावती कॅम्प 9890967003
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-