आरोग्य सेवक व सेविका यांना सॅनिटायझरचे वाटप…

आरोग्य सेवक व सेविका यांना सॅनिटायझरचे वाटप…

वेंगुर्ला :

वेंगुर्ला शहरात कोविड-१९ अंतर्गत सर्वेक्षण करुन कोविड केअर सेंटरला सहकार्य करणारे आरोग्यसेवक आर. आर. नाथगोसावी आणि आरोग्यसेविका व्ही. व्ही. तांडेल यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय म्हणून वेंगुर्ला छावा संघटनेतर्फे त्यांना फेस मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर, मास्क आदींचे वाटप करण्यात आले.

यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत साळगांवकर, तालुका संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर रेडकर, शहरप्रमुख प्रथमेश गुरव, तालुका प्रवक्ता सिद्धेश रेडकर, तालुका समन्वयक राहूल मोर्डेकर, तालुका उपाध्यक्ष रोहित पडवळ, तालुका खजिनदार महेश गुरव, तालुका संघटक गजमुख गावडे, तालुका सचिव हर्षवर्धन गावडे, सदस्य अद्वैत आंदुर्लेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा