You are currently viewing पुस्तक वाचा मोबाईल हटवा

पुस्तक वाचा मोबाईल हटवा

*पुस्तक वाचा मोबाईल हटवा*

*श्री प्रकाश विठोबा कानूरकर*

मोबाइल फोनवर व्हिडीओ गेम्स खेळायला सगळ्यांनाच आवडतं. त्यात किती वेळ जातो हे कळतही नाही, पण सतत गेम्स खेळल्याने मेंदूवर वेगळेच फारसे चांगले नसलेले परिणाम होतात. मुख्य म्हणजे अभ्यासात याचे अडथळे येतात. डोळ्यांवर वाईट परिणाम तर ‘होतातच, पण मेंदूही आळशी होतो. मेंदूला एकाग्र होणं जमत नाही. नक्की कोणतं उत्तर लिहायचं, यांचा गोधळ होतो. आपल्या मेंदूतल्या ग्रे मॅटर या भागावर जास्त मोबाइल गेम्स बघण्याचा परिणाम होतो. शिवाय त्यात आपला वेळ किती जातो हेही समजत नाही. आपण जर स्क्रीनचा खूप वापर करणं सोडलं नाही तर शरीर आणि मेंदूवरचे हे दुष्परिणाम वाढतच जातात; पण आपला मेंदू उत्साही करायचा असेल आणि त्याला अभ्यासात ठेवायचं असेल तर काय करायचं? तर स्क्रीनचा मर्यादित वापर करायचा आणि त्याऐवजी भरपुर पुस्तकं वाचायची. विविध पद्धतीचं वाचन केल्यामुळे मेंदूमध्ये खूप चांगले बदल घडून येतात, सगळ्या प्रकारच्या अभ्यासासाठी ही एक गोष्ट खूप मदत करते, ती म्हणजे वाचन, पाठयपुस्तकांचं वाचन हा झाला अभ्यासाचा भाग. पण गोष्टीची पुस्तकही वाचायला हवीत विशेष माणसाची, शास्त्रज्ञांची, खेळाडूंची, उद्योजकांची चरित्र
आत्मचरित्रं, अजिबातच खऱ्या नसलेल्या फक्त कल्पनाशक्ती वापरून लिहिलेल्या गोष्टी असतील किंवा काळाच्या पुढे जाऊन विज्ञानाचा आधार घेऊन लिहिलेल्या कथा असतील. साहसकथा असतील. पुस्तकांचे असे अनेक प्रकार असतात. असं काहीही वाचलं तरी ते आपल्या मेंदूत जातं. संपूर्ण पुस्तक लक्षात राहिलं नाही तरी त्यातल्या ठळक, आपल्याला आवडतील यांचा उपयोग ठिकठिकाणी होतो. पण त्यासाठी आधी काही प्रश्न स्वतःलाच विचारा!
– एकेक प्रश्न विचारा, प्रत्येक उत्तरासाठी दोन मिनिटं थांबा. आठवा. स्वतःला उत्तर द्या आणि मगच पुढच्या प्रश्नांकडे वळा.
१. मी कोणकोणती गोष्टीची पुस्तकं वाचली आहेत?
२. त्यातली किती आणि कोणती पुस्तकं मला आत्ता लगेच आठवताहेत?

३. कोणती पुस्तकं जरा स्मरणशक्तीला ताण दिल्यावर आठवतात?

४. या पुस्तकांचे विषय काय होते ?
५. या पुस्तकांमधलं मला काय आवडलं? पुस्तकातली एखादी व्यक्तिरेखा, एखादी कल्पना, प्रसंग, गंमत

६. कधीकधी एखादं पुस्तक किंवा त्या पुस्तकातली एखादी गोष्ट आवडत नाही. असं का होतं?
• एखाद्या पुस्तकातली अशी एखादी न आवडलेली व्यक्तिरेखा कोणती?. ती का आवडली नाही? एखादी अशा गोष्टी नक्की लक्षात राहतील. कल्पना का आवडली नाही?
७. तुम्ही वाचलेल्या पुस्तकात चित्रं होती का, ती चित्र आठवताहेत का? कोणत्याही प्रकारचं वाचन केल्यामुळे आपली भाषा- वाक्य सुसंगत होतात. विचारांना एक ओघ येतो. शब्दसंपत्ती वाढते. त्यामुळे अनेक ठिकाणी चपखल शब्दवापरता येतात. एक प्रकारे आपल्या
अभ्यासाला यांची नकळत मदत होते. हातात सतत मोवाइल असेल आणि त्यावर गेम्स चालू असण्यापेक्षा हातात कोणतंही पुस्तक असेल आणि ते तुम्ही वाचत असाल. विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरं छानपैकी देता आली तर यांचा भरपूर चांगला उपयोग आपल्याला अभ्यासात खूपच होईल, मग, तुम्ही आता विचार करा आपण हातात काय घ्याल? पुस्तक की मोबाइल फोन?

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा