गोवा बांबूळ येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिंधुदुर्गच्या माध्यमातून एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण सिंधुदुर्गात उपलब्ध नसलेल्या वैद्यकीय सेवेसाठी कित्येक वर्षे गोवा बांबोळि काॅलेज व रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेली अनेक वर्षे जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना गोवा बांबोळि येथे उपचार करून घेणे सुलभ व्हावे शासकीय योजनांचा लाभ घेणे व आवश्यक सहकार्य या करीता या पुर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कर्मचारी नियुक्त केले होते. सदर कर्मचारी गोवा बांबोळि येथे गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या प्रकारे सहकार्य करीत होते त्यामुळे सिंधुदुर्गातील रुग्णांना गोवा बांबोळि येथे उपचार घेणे सुलभ होत होते परंतु गेले दोन ते तीन वर्षे गोवा बांबोळि येथे रुग्णालयात असणारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना गोवा बांबोळि येथे अनेक समस्या भेडसावत होत होत्या.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर यानी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे लोक प्रिय खासदार विनायकजी राऊत साहेब आमदार वैभवजी नाईक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा प्रजित नायर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे डॉ संदेश कांबळे यांच्याशी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर यानी गेले सहा महिने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून गोवा बांबोळि येथील रुग्णालयांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील रुग्णांना मागदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच खासदार विनायक राऊत साहेब आमदार वैभवजी नाईक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा प्रजित नायर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे डॉ संदेश कांबळे या सर्वांचे मा जि प सदस्य राजू कविटकर यानी आभार मानले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा प्रजित नायर यांचे जि प सदस्य राजू कविटकर व कौशल्य जोशी यांनी अभिनंदन केले.