इचलकरंजी : प्रतिनिधी
3 मे पासून उसळलेला मणिपूरमधला शासन पुरस्कृत हिंसाचार हा आपल्या लोकशाहीवरचा आघात आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. मणिपूरमधील हिंसाचाराकडे बेजबाबदारपणे दुर्लक्ष करणाऱ्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणी संविधान परिवार आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय यांच्यावतीने महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करत व्यक्त करण्यात आली.
यावेळी लोकराजा राजर्षी शाहू संविधान संवादक केंद्राचे कार्याध्यक्ष सुनिल स्वामी म्हणाले, ” गेले तीन महिने मणिपूर जळते आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त काळ येणाऱ्या हिंसाचाराच्या बातम्या दडपल्या जात आहेत. इंटरनेट बंद आहे. मणिपूरमध्ये मानवी हक्कांची, संविधानाची उघडउघड पायमल्ली सुरू आहे. आदिवासी आणि बिगरआदिवासी जाती जमातींना एकमेकांविरुध्द उभे केले जात आहे. विद्वेषाच्या राजकारणात मणिपूर होरपळत आहे.
विवेकवाहिनीच्या राधिका शर्मा म्हणाल्या,” मणिपूरमध्ये भर दिवसा पुरुषांचा प्रचंड जमाव दोन स्त्रियांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढतो व त्यांच्यावर लैंगिक हल्ले करतो , ही अत्यंत व्यथित करणारी आणि संतप्त करणारी घटना उघडकीस आली आहे. देशात महिलांना जगणे मुश्कील होत असताना सरकार काय करत आहे? “असा सवाल उपस्थित केला.
जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयचे राज्य समन्वयक संजय रेंदाळकर म्हणाले, “4 मेच्या या घटनेचा व्हिडिओ तब्बल 77 दिवसांनी समोर आला आणि या घटनेला वाचा फुटली. आता, अशा शेकडो घटना घडल्या व घडत आहेत असे खुद्द मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणत आहेत. हे अत्यंत संतापजनक, दुःखद आणि मानवतेला काळीमा फासणारे आहे.”
मणिपूरमधील हिंसाचाराला नजरअंदाज करणा-या गृहमंत्र्यांनी तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था स्थापन न करु शकलेल्या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा.
सध्या देशाच्या राष्ट्रपति या आदिवासी महिला आहेत , त्यांनी मणिपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराची दखल घ्यावी आणि मणिपूरमध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी व तेथील जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी त्वरीत पावले उचलावीत ,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.या निदर्शनात प्रा. अमर कांबळे, बजरंग लोणारी, बसवराज कोटगी, रोहित दळवी, अशोक वरुटे, अमोल पाटील, प्रशांत खांडेकर, शरद वास्कर, विनायक होगाडे, सनोफर नायकवडी, उर्मिला कांबळे, अमित कोवे, पवन होदलूर, प्रशांत आवळे, दिग्विजय चौगुले, साद चांदकोटी, दामोदर कोळी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/