You are currently viewing भ्रष्ट मक्तेदारांचा अधिवेशनात प्रश्‍न मांडणार : आम.प्रकाश आवाडे

भ्रष्ट मक्तेदारांचा अधिवेशनात प्रश्‍न मांडणार : आम.प्रकाश आवाडे

इचलकरंजी/प्रतिनिधी –

काम न करता बोगस कागदपत्रे तयार करुन बिले आदा करण्यात आल्याप्रकरणी भ्रष्ट मक्तेदारांचा
चालू पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करणार असल्याने मागील दहा वर्षात जी विकासकामे झाली आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती मिळावी, अशा सूचना आमदार प्रकाश आवाडे यांनी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर शुध्द पेयजल प्रकल्प, नवीन जलकुंभांची उभारणी, कृष्णा योजना जलवाहिनी बदल आणि मैलखड्डा येथील बायोमायनिंग प्रश्‍नी महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या चालढकल कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार आवाडे यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले.

केवळ कागदपत्रो कामाची नोंद करुन प्रत्यक्षात काम न करता लाखो रुपयांची बिले आदा करण्यात आल्याची दोन प्रकरणे महापालिकेत
नुकतीच उघडकीस आली आहेत. याशिवाय आणखीन काही प्रकरणे असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची भेट घेऊन यासह विविध प्रश्‍नांवर ऊहापोह केला. आमदार आवाडे यांनी बोगस कामांची गांभिर्याने दखल घेतली असून या संदर्भात चालू पावसाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करणार आहेत. त्यासाठी महापालिकेचे मक्तेदार संजय घोडके, शैलेश पोवार, संजय मुरग्याप्पा पाटील आणि विनय राठी यांच्यासह ज्या ज्या मक्तेदारांनी मागील दहा वर्षात जी कामे केली आहेत त्याबाबतचा संपूर्ण तपशिल आणि माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आमदार आवाडे यांनी आयुक्तांना दिल्या आहेत.
त्याचबरोबर आसरानगर परिसरातील मैलखड्डा येथील बायोमायनिंग संदर्भात शासनाकडून आदेश होऊनही महापालिका प्रशासन या कामात दिरंगाई करत आहे. भागातील नागरिकांच्या वारंवार तक्रारी आणि आंदोलनानंतरही प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने नागरिक विशेषत: महिला वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. हा प्रश्‍न आणखीन गंभीर स्वरुप घेण्यापूर्वी त्याची सोडवणूक करावी, असे आमदार आवाडे म्हणाले. तर चार वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून शहरासाठी 100 शुध्द पेयजल प्रकल्प आवश्यक त्या निधीसह मंजूर करुन आणले आहेत. परंतु ते काम पूर्णत्वास जावू नये यासाठी काहीजणाची टोळी कार्यरत असल्याचा घणाघातही आमदार आवाडे यांनी केला. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन होऊन नागरिकांना वेळच्या वेळी पाणी मिळावे म्हणून शहरात 6 नवीन जलकुंभ उभारणीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यास प्रशासनाला सांगितले आहेत. परंतु त्या कामातही चालढकल केली जात असून नागरी प्रश्‍नांबाबत प्रशासनाला काहीच गांभिर्य नसल्याबद्दल खडे बोल सुनावले. याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, डॉ. राहुल आवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, चंद्रशेखर शहा, रणजित जाधव, राहुल घाट, गुंडू गोरे, अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.
दरम्यान, तत्पूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे भेट दिली. शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे या रुग्णालयासाठी सिटीस्कॅन मशीन मंजूर झाले आहे. त्या संदर्भात मशीनची पाहणी करून आढावा घेतला. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. नंदनकुमार बनगे, डॉ. दिलीप वाडकर, डॉ. पोळ, डॉ. बागवान व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा