अतिवृष्टीमुळे इन्सुली घाटात कोसळले आंब्याचे झाड
सावंतवाडी
इन्सुली घाटातील सातजाभाळ देवस्थान नजीक रस्त्यावर आंब्याचे झाड पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. जुना मुंबई गोवा हायवे वर इन्सुली घाटीत या पडलेल्या आंब्याच्या झाडामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. इन्सुलितील उत्कर्ष युवक कला क्रीडा व्यायाम मंडळ व डोबाचिशेळ वासियांनी रात्री सव्वा आठच्या सुमारास भर पावसात झाड साफ करून रस्ता वास्तुकीस सुरळीत केला.