You are currently viewing जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची होणार कोविड – 19 तपासणी….

जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची होणार कोविड – 19 तपासणी….

सिंधुदुर्गनगरी 

23 नोव्हेंबर 2020 रोजी पासून इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड – 19 ची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

            यामध्ये अनुदानित व विना अनुदानीत या दोन्ही शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची तपासणी होणार आहे. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी इतर काही अजार आहेत किंवा काही त्रास आहे. तसेच ज्याचे वय जास्त आहे अशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. तर इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी रॅपीड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये होणारी ही तपासणी संपूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. तसेच या तपासणीसाठी लागणारी किट ही जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत पुरवठा करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सध्या या तपासणीसाठी नमुने घेण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर सुरू करण्यात आले आहे.

            या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व सरकारी, अनुदानिक, विना अनुदानिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची तपासणी होणार आहे. जिल्ह्यातील एकूण 256 शाळांमधील 1 हजार 892 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये माध्यमिकच्या 1 हजार 323 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तसेच उच्च माध्यमिकच्या 569 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

            9 वी ते 12 वी च्या शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण शालेय स्तरावर करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा