*पणदूर – घोडगे राज्य महामार्ग 24 तास उलटले तरी पाणीखाली
कळसुली ग्रामस्थांनमधुन संताप व्यक्त
कळसुली ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांच्या सहकार्याने ग्रामस्थांना घेऊन प्रवाशांना जेवण वाटप*
कुडाळ
कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे १९/०७/२०२३ ते २३/०७/२०३ पासुन पणदुर घोडगे रस्त्यावर पाणी आलेले आहे . त्यामुळे लोकांची व बस ने येणा-या प्रवासांची गैरसोय झाली. लघुपाटबंधारे विभाग, कणकवली यांना सुचित करुनही कोणतीही कार्रवाई झाली नाही. पाणी सोडले नसल्याने पाणी रस्त्यावर आले… त्यावर उपाययोजना न केल्यास जलसमाधी घेऊ असा ग्रामस्थानी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
कळसुली ग्रामपंचायत सदस्य तथा सचिव कै. सुरेश सुद्रिक चॅरिटेबल ट्रस्ट कळसुलीचे प्रफुल्ल सुद्रिक यांच्या मदतीने कळसुली ग्रामस्थांनी गैरसोय झालेल्या प्रवाशांची जेवणा खाण्याची सोय केली आहे. यामध्ये सतीश तेली, चंदू चव्हाण, रवींद्र घोगळे, सागर शिर्के, मधु शिर्के, अनिल भोगले, वामन भोगले, बाबू लाड, पंढरी मुरकर, मंगेश भोगले प्रवीण दळवी, प्रकाश सातवसे, आदी कळसुली ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.