तातडीने दुरुस्ती करण्याची मनसे अध्यक्ष सुनील गवस यांची मागणी
दोडामार्ग
मांगेली कडे जातानामुख्य रस्त्यावरती दरडी कोसळल्या असल्याने दोन्ही बाजूच्या गटारात माती वाहून आल्याने रस्ता बंद झाला आहे याकडे लोकप्रतिनिधी वारंवार पाठपुरावा मागणी करूनही बांधकाम विभागांने दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर दरड कोसळली आहे याकडे तातडीने लक्ष घालावे अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष सुनील गवस यांनी केली आहे तालुक्यातील प्रमुख असलेल्या धबधब्याकडे मोठ्यप्रमाणावर पर्यटक येतात या रस्त्यावर कायम वर्दळ असते असे असतानाही या रस्ता वाहतुकीस अडथळा होउ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आज सकाळी अतिवृष्टी मुळे या मार्गावर खोक्रल – मांगेली धबधबा, खोक्रल धार – मांगेली कुसगेवाडी, देऊळवाडी या ठिकाणी ठिकठिकाणी रस्तावाहून गेला आहे तर काही ठिकाणी चिखल झाला आहे रस्त्यावरती काही ठिकाणी मोठे दगड व माती सह डोंगराचा काही भाग कोसळून रस्त्याच्या दुतर्फा असलेले गटारात माती वाहून आल्याने दगड मातीमुळे रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत असून गटारातील माती व दगड धोंडे रस्त्यावरती आल्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग या दोन्ही विभागांनी सदर गटारातील दरडी कोसळलेल्या काढून गटार पूर्ववत करावे व होणारी गैरसोय होत आहे याकडे लक्ष देण्याची मागणी मनसे दोडामार्ग तालुकाध्क्ष सुनिल गवस यांनी केली आहे