You are currently viewing ग्राहक पंचायत कणकवली तालुका अध्यक्षपदी श्रध्दा कदम

ग्राहक पंचायत कणकवली तालुका अध्यक्षपदी श्रध्दा कदम

कणकवली

ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची कणकवली तालुका कार्यकारणीची सभा नुकतीच संपन्न झाली . कणकवली येथे आयोजित या सभेमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अभ्यास वर्ग 2023 या 5-6 ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणाऱ्या अभ्यास वर्गाबाबत चर्चा करण्यात आली . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त सभासदांनी या अभ्यास वर्गाला उपस्थित राहावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी केले .
या सभेमध्ये कणकवली तालुकाच्या नूतन कार्यकारणीला अंतिम स्वरूप देण्यात आले . नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे .
अध्यक्ष – श्रध्दा कदम , उपाध्यक्ष – गितांजली कामत , संघटक – चंद्रकांत चव्हाण , सहसंघटक – शीतल मांजरेकर आणि सुभाष राणे ,सचिव- पूजा प्रकाश सावंत ,
सहसचिव – विनायक सुरेश पाताडे ,कोषाध्यक्ष – आयेशा निरसो सय्यद,प्रसिध्दी प्रमुख – विजय गांवकर ,सदस्य- अनिल चव्हाण , श्रध्दा पाटकर,सल्लागार – अशोक करंबेळकर ,मनोहर पालयेकर . जिल्ह्यातील जास्तीत जास्त सजग ग्राहकांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सदस्यत्व स्वीकारावे , असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या मार्फत करण्यात आले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा