You are currently viewing नागरिकांनी 24 तारीख पर्यंत सतर्क रहावे – जिल्हाधिकारी के मजुलक्ष्मी

नागरिकांनी 24 तारीख पर्यंत सतर्क रहावे – जिल्हाधिकारी के मजुलक्ष्मी

येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस हवामान खात्याकडून सुचना..

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात येणाऱ्या दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून तशाप्रकारे अलर्ट करण्यात आले असून नागरिकांनी 24 तारीख पर्यंत सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आज येथे केले. तर आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य वेळीच व्हावे यासाठी ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावरील यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. त्यासाठी तालुकावार तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली व्हाट्सअँप ग्रुप निर्माण करण्यात आले आहेत यामार्फत माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली चार तालुक्यांची आपत्कालीन आढावा बैठक आज येथील तहसीलदार कार्यालयात पार पडली.

यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी वर्गांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तद्नंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर ,तहसिलदार श्रीधर पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते
जिल्हाधिकारी म्हणाल्या, सिंधुदुर्गात आजपासून काहीसा पाऊस ओसरला तरी पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे गेले दोन दिवस जिल्हा येड अलर्ट मध्ये होता आज ग्रीन अलर्ट मध्ये आला असला तरी 24 तारीख पर्यंत नागरिकांनी सतर्कता बाळगावी या काळात नदी ओहोळ आधी परिसरात महिलांकडून कपडे धुण्यासाठी जाऊ नये तसेच च्या परिसरात सेल्फी घेण्याचे प्रकारही टाळावेत सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदी तसेच कुडाळ कर्ली नदीने काल धोक्याचे पातळी ओलांडली असली तरी स्थानिक यंत्रणेकडून तेथील नागरिकांना अलर्ट करण्यात आले होते आवश्यक असल्यास स्थलांतराच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या अशा प्रकारची गरज भासल्यास जिल्हा परिषद शाळा उपलब्ध करून देण्याची सूचना केल्या आहेत. जिल्ह्यात काल प्रभागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. त्यामुळे कुठेच मोठी हानी झाली नाही.नुकसान झालेल्या अपघातांना भरपाई देण्याचे काम तसेच पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा