गुणवत्ता मूल्यांकन : अध्यापन पद्धत, शैक्षणिक उपक्रमांत अग्रेसर….
सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये ‘एक्सलंट’ हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे._
_मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते. यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल, राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम इंडस्ट्रिअल व हॉस्पिटल व्हिजिट्स, प्रयोगशाळा भेटी, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यक्तिमत्व व उद्योजकता विकास कार्यक्रम, आदी अनेक गोष्टींचा समावेश असतो. सर्व बाबींची काटेकोर तपासणी केल्यानंतर मंडळामार्फत पुअर, सॅटीस्फॅक्टरी, गुड, व्हेरी गुड, एक्सलंट अशा श्रेणींमध्ये मानांकन देण्यात येते. यापैकी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी. फार्मसी विभागाला एक्सलंट हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे._
_यासाठी प्राचार्य डॉ. विजय जगताप, विभाग प्रमुख प्रा.ओंकार पेंडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी कठोर मेहनत घेतली. तसेच यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसीचे प्राचार्य सत्यजित साठे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. स्थापनेच्या पहिल्या वर्षापासूनच कॉलेजला मंडळाचे व्हेरी गुड हे मानांकन मिळत आलेले आहे. परंतु आता कॉलेजला मिळालेल्या एक्सलंट श्रेणीबद्दल कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई व प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे._