You are currently viewing यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या प्राचार्यपदी डॉ.रमण बाणे…

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या प्राचार्यपदी डॉ.रमण बाणे…

अभियांत्रिकी क्षेत्रात जिल्ह्याचे नाव उंचावण्याचा मानस…

सावंतवाडी

येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ.रमण बाणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे._
_चराठे येथील भोसले नॉलेज सिटी या शैक्षणिक संकुलात चालूवर्षी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी हे डिग्री इंजिनिअरिंग कॉलेज सुरु झाले आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखा उपलब्ध आहेत._
_डॉ.रमण बाणे हे उच्चविद्याविभूषित असून त्यांना २४ वर्षांचा प्रदीर्घ असा अध्यापनाचा अनुभव आहे. राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था (N.I.T.), सुरतकल या प्रतिष्ठीत संस्थेमधून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयातील डॉक्टरेट त्यांनी प्राप्त केली आहे. आयआयटी खरगपूर तसेच एआयसीटीई, नवी दिल्ली यांची शिष्यवृत्ती देखील डॉ.बाणे यांना प्राप्त झाली आहे. कॉम्प्युटर सोबतच आर्टीफ़िशिअल इंटेलिजंस, मशीन लर्निंग, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या विषयात त्यांचे प्राविण्य आहे. देश विदेशातील नामांकित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा अनुभव त्यांना असून आजमितीपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे चाळीसपेक्षा जास्त शोध निबंध त्यांनी प्रकाशित केले आहेत._
_प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारताना डॉ.बाणे यांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग विद्यार्थ्यांना नक्की होईल व त्याद्वारे अभियांत्रिकी क्षेत्रात जिल्ह्याचे नाव वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व कार्यकारी मंडळाने त्यांच्या पुढील कामकाजासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या._

प्रतिक्रिया व्यक्त करा