You are currently viewing इचलकरंजीत निवेदन , सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन

इचलकरंजीत निवेदन , सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद, रोटरी क्लब सेंट्रल व एक्झिक्युटिव्ह आणि मनोरंजन मंडळ युवक विभाग यांच्यावतीने ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत कार्यशाळा’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये प्रसिद्ध नाट्य व दूरदर्शन अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक आणि मुलाखतकार विघ्नेश जोशी हे सदर कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदरची कार्यशाळा शुक्रवार दिनांक २८ जुलै रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेत निवेदन व सूत्रसंचालन यातील फरक, निवेदकाची जबाबदारी, कार्यक्रमाची पूर्वतयारी, निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी, इत्यादी बाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा १६ वर्षावरील युवक, युवती आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रम करणा-या सर्वांसाठी उपयुक्त असून इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी मनोरंजन मंडळ, दाते मळा, इचलकरंजी येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा