*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*स्मृतिगंध -भेट*
स्मृती, अनेकानेक,पाठ न सोडणाऱ्या,गोड कडू आंबट तिखट
सर्व प्रकारच्या स्मृती , कधी हसवणाऱ्या तर कधी रडवणाऱ्या
देखील . काही स्मृती हृदयाच्या कप्प्यात कायमच्या बंद ,कधी ही न उघडण्यासाठी.अंतर्रमनात खोल डोहात बुडवलेल्या,
कधी ही वर दाखवता येणाऱ्या, वेदनादायक अशा, पुरलेल्या
हे ही सत्य आहेच.
तरी ही मुखवटा धारण करून माणूस सामोरा येतो , हसत,
वेदनेचं चिन्ह ही दिसू नये असा प्रयत्न करत .! हो , याला जीवन ऐसे नाव ! जीवन निम्मेच उघड असते , निम्मे पोटात
असते, सर्वांच्याच, कोणी हो म्हणो अथवा नाही म्हणो ..
चालायचेच …आयुष्याच्या चढ उतारावर खेळायला मजा
येतेच ना ?
करता करता माणूस ध्येया पर्यंत पोहोचतोच नि मग अननुभूत
असा आनंद होतो. मनाला कुठे वय असते, ते तर चिरतरूणच
आहे ना ? त्या मुळे भले कुणाला अंगावर वार्धक्याच्या खुणा
दिसोत पण माणूस मनाने तरूणच असतो हे सत्यच आहे..
त्यामुळे कधी ते पटकन बालपणात जाते तर कधी चटकन्
तारूण्यात जाते… सारे कसे लख्ख दिसू लागते.
आमचे बालपण खेड्यात गेले,मातीच्या घरात. तशी मी लहान
पणापासून निसर्ग वेडी आहे .आमच्या घराच्या मागे पांढरी-
म्हणजे शेती वाडी होती. त्याला साबरकांड्याचे कंपाऊंड
होते.त्या साबरकांड्याला लालभडक लांबटगोल रंगाची
फळे येत असत . ती तोडून आम्ही खात असू. आणि बाभळीच्या वाळलेल्या शेंगा पायाच्या बोटांना बांधून खेळत
असू.त्यांचा खळ्ळछन्न आवाज अजून कानात घुमतो.
पांढरीतील माती बादल्यांनी आणून सिमेंटच्या फरशीवर
मागच्यादारी थर घालून मी झेंडूची कोरडी फुले चुरून मी त्याची रोपे तयार करून झेंडू लावत असे व फुले आली की
खुष होत असे.शेतावर जातांना रस्त्याच्या कडेने गवतात
असंख्य टणटणीची फुले डुलतांना वाऱ्यावर मजेत झोके
घेतांना दिसत जणू म्हणत असत .. तुम्ही पहा अथवा नका
पाहू आमच्याकडे पण बघा वारा डुलवतोय आम्हाला?
किंचित हिरवट पिवळट रंगाची पिटुकली पिटुकली ही फुले
मला फार आवडत असत .हातात घेऊन त्यांना मी कुरवाळीत
असे व पुन्हा वाऱ्यावर झोके घ्यायला सोडून देत असे.
आणि आता इ…त …. क्या ऽऽऽऽ वर्षांनी….
काही कामा निमित्त मी सिन्नर घोटी रस्त्याने जात असतांना
सिन्नर रस्त्यावर आडवाटेवर माजलेल्या गवतात उंच उंच अशी
गवताच्या पात्यांसोबत टणटणीची फुले डुलतांना मला दिसली
नि मी पुन्हा एकदा लहान झाले.कोण आनंद झाला इतक्या
वर्षांनी ती फुले पाहिल्यावर ..सारे बालपण सर्र क्कन डोळ्यां
समोरून गेले, मी कापडण्यालाच पोहोचले पुन्हा! मी ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली . खाली उतरले, त्या
सुंदर नाजुक फिकट रंगाच्या फुलांनी मला खेचून घेतले.
घेतल्या.इतक्या वर्षांनी भेटलीस ना?
हळूवारपणे फुलांच्या पाच सहा काड्या मी जवळ घेतल्या.
गालाला लावल्या. माझ्या त्या सुंदर बालमित्रांना मी कुरवाळले. ते ही हसले, डुलले, त्यांनी मला पाहून गिरक्या
घेतल्या.
बरे झाले , इतक्या वर्षांनी तरी भेटलीस .. जणू ते म्हणत होते.
मला त्यांना सोडवेना . मोठ्या जड अंत:करणाने मी त्यांचा
निरोप घेतला.त्यांच्यावरील दंवबिंदूही सर्रकन खाली ओघळले!
माझे अश्रू त्यात मिसळले. एकमेकांच्या प्रेमाची साक्ष पटली.
कशीबशी त्यांची नजर टाळत मी गाडीत बसले .
व गाडी पुढे निघाली. माहित नाही आमची पुढची भेट
ठरलेली आहे की नाही? भेटू किंवा भेटणार ही नाही , ते असतील हो , पण मी …? मी असेन का ?
ही अनोखी भेट मात्र कधी ही नजरेतून जाणार नाही , हे मात्र
नक्की …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २८ फेब्रुवारी २०२२
वेळ : रात्री १० : १४
.
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-