वेंगुर्ला :
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, सावंतवाडी मतदारसंघ व दिपकभाई केसरकर मित्र मंडळ यांच्यावतीने लोकमान्य हॉस्पीटल पुणे यांच्या सौजन्याने आयोजित मोफत मेगा आर्थोपेडीक कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १०० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. हे शिबीर ग्रामीण रुग्णालय शिरोडा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन वेंगुर्ले शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, माजी पंचायत समिती सदस्य उमा मठकर, राजन गावडे, डॉ. प्रसाद साळगांवकर, डॉ. देसाई, डॉ. शेटकर, डॉ. सायली पावसकर, लोकमान्य हॉस्पिटलचे डॉ. प्रसाद भिंबरवाड M.D., डॉ. अश्विनीकुमार, श्री. सचिन पवार, श्री. राजा सावंत, श्री. काळे, लोकमान्य हॉस्पीटलचे PRO श्री. वेद दळवी, श्री. दिलिप मठकर, श्री. दत्तगुरु परब, श्री. बाबा वारंग, श्री. कौशिक परब, श्री. अमित गावडे, नमिता कांबळी, रेडी उपसरपंच, श्री. शेखर कुडव, सांगरतीर्थ सरपंच, तसेच मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.
वेंगुर्लेवासियांसाठी हाच कॅम्प दिनांक १९ जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ले येथे होणार आहे.