सावंतवाडीत शास्त्रीय पखवाज प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन…

सावंतवाडीत शास्त्रीय पखवाज प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन…

सावंतवाडी

सावंतवाडी, सबनीसवाडा श्री इस्वटी महापुरुष मंदिर येथे आज डॉ.दादा परब तसेच भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या पखवाज वादन प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी दै. तरुण भारत चे पत्रकार अशोक बोलके, अतुल गवस, बुवा कुणाल वारंग, तरुण भारत कर्मचारी तसेच वामन सावंत, विठ्ठल गावडे, रामा मेस्त्री, बांदा पखवाज विद्यालय शाखेचे मॉनिटर कु.प्रदीप वाळके, तसेच विद्यार्थी वर्ग मधील लाडशेट इनर, सुदेश सावंत, सुभाष नाईक, मोतीराम समळकर उपस्थित होते. क्लास चालू करण्यासाठी कु.कृष्णा परब आणि कु.संकेत म्हापणकर यांनी विशेष मेहनत घेतली व श्री महापुरुष देवस्थान चे  स्वप्नील सावंत, श्री. पटेल तसेच देवस्थान चे सर्व पदाधिकारी यांचे मोठे सहकार्य लाभले. दर बुधवारी 3.30 वाजता पखवाज वादन प्रशिक्षण वर्ग चालू झालेले आहेत तरी संगीत पखवाज प्रेमी विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश नोंदवावा असे आवाहन विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश सावंत तसेच सावंतवाडी पखवाज शाखेचे विद्यार्थी प्रमुख कु.कृष्णा परब व कु.संकेत म्हापणकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

संपर्क :- 

महेश सावंत मो.8805891575 / 9420307336,

कु.कृष्णा परब मो.9011736570,

कु.संकेत म्हपणकर मो.8275852313

प्रतिक्रिया व्यक्त करा