तत्काळ भरपाई देण्याची रमाकांत जाधव यांची मागणी
दोडामार्ग
अतिवृष्टीमुळे शेर्ले (ता.सावंतवाडी) येथील अंकुश वामन जाधव यांच्या घरावर फणसाचे झाड कोसळून हजारो रूपयांचे नुकसान झाले. आहे. प्रशासनाने कुटुंबियांना तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी आरपीआयचे (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव यांनी केली.त्यांनी आपदग्रस्तांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली.यावेळी शेर्ले सरपंच प्रियंका जाधव, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश कांबळे, रामदास कांबळे,आपदग्रस्त व शेर्ले ग्रामस्थ उपस्थित होते.
घरावर झाड कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. भिंतीना तडे गेलेले आहेत.सद्यस्थितीत तात्पुरती सोय कुटुंबियांनाी केलेली असली तरी, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण वाढत आहे. पुढे पावसाळा शिल्लक आहे. असे असताना त्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. सद्यस्थितीत त्या घरात राहणे धोकादायक आहे. नवीन घर बांधणी शिवाय अन्य पर्याय त्यांच्याकडे नाही;पण आर्थिक परिस्थिती नसल्याने नवे घर बांधणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने नुकसान भरपाई आणि नवीन घरासाठी अर्थासाह्य द्यावे अशी मागणी श्री.जाधव यांनी केली आहे. सावंतवाडीचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना भेटून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले