You are currently viewing कणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद…

कणकवलीत जनता कर्फ्यूला उस्फुर्त प्रतिसाद…

कणकवली
कणकवली शहरात कोरोना व्हायरस ची पसरत असलेली साखळी रोखण्यासाठी रविवार पासून आठ दिवसांसाठी पाळण्यात येत असलेल्या जनता कर्फ्यूला सकाळपासूनच उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. कलमठ, जानवली, वरवडे, तरेळे या गावांमध्ये सुद्धा जनता कर्फ्यु पाळला आहे. गावात सर्वत्र शांतता आहे.
सकाळच्या सत्रात दूध व वृत्तपत्र विक्री सुमारे दोन तास चालु होती. मात्र त्यानंतर सर्वत्र शुकशुकाट होता. रस्त्यांवर पोलीस बंदोबस्तही नव्हता. मात्र तरीही या जनता कर्फ्यू मध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याचे दिसत होते. प्रवासी उपलब्ध नसल्याने एसटी वाहतुकीवर परिणाम झालेला असला तरीही वाहतूक मात्र चालू होती. रिक्षा संघटना ही या कर्फ्युत सहभागी झाली आहे. जनता कर्फ्यू मध्ये सर्वत्र स्वतःहून नागरिक सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 11 =