कणकवली
भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेची राज्यस्तरीय विभागस्तरीय व जिल्हास्तरीय सभा संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी यांच्या समवेत ओरोस रवळनाथ मंदिर येथे बैठक पार पडली. यावेळी भारतीय चर्मकार समाज सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून सी. आर .चव्हाण यांचे नाव तर जिल्हा सरचिटणीस म्हणून संतोष जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले.
काही दिवस सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष या रिक्त पदाचा रेंगाळत चाललेला विषय हाती घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस तसेच काही पदाधिकारी यांच्या नेमणूका करण्यात आल्या. सदर बैठकीमध्ये सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष म्हणून सी. आर .चव्हाण यांचे नाव घोषित करण्यात आले. व जिल्हा सरचिटणीस म्हणून संतोष जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले.
तसेच जिल्हा महिला अध्यक्ष सौ .लक्ष्मी रमाकांत बांबर्डेकर यांची व जिल्हा उपाध्यक्ष श्री. देवरुखकर, सहदेव चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून बाबल नांदोस्कर यांची निवड करण्यात आली. यापुढे इतर तालुका अध्यक्ष व तालुका सरचिटणीस यांनी कशाप्रकारे कामकाज पाहण्याचे आहे हे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस व पदाधिकारी हे सांगतील असे ठरविण्यात आले. ज्या पदाधिकारी यांना यापूर्वी पदे दिलेली आहेत त्या पदांचा फेरबदल करण्यात आला आहे. कोणत्याही पदाधिकारी यांना संघटनेमधून मुक्त करण्यात आलेले नाही. पुढील जिल्हा कार्यकारिणी हे जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिव यांनी नेमणे व तशी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली. या बैठकीमध्ये बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित असून त्यांनी मार्गदर्शन केले व आपल्या कामानिमित्त आपले विचार मांडून संघटनेचे ध्येय धोरण निश्चिती करण्याकरिता विचार स्पष्ट केले. संघटनेचे राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी नवीन नेमणुका झालेले अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले तसेच या सभेत राज्य सरचिटणीस अरुण होडावडेकर ,राज्य उपाध्यक्ष प्राजक्त चव्हाण,चंद्रकांत चव्हाण. सुरेश चौकेकर तसेच कार्याध्यक्ष अनिल चव्हाण व सहसचिव प्रतिक्षा चव्हाण, संचालक सौ. मालिनी चव्हाण, गणेश चव्हाण उपस्थित होते. तसेच कणकवली तालुका अध्यक्ष प्रभाकर जाधव, सिंधुदुर्ग युवा संघटना सचिव अनिलकुमार चव्हाण उपस्थित होते.