*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण यांनी मिर्झा बेग यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*
*मिर्झा एक्सप्रेस*
*डॉ. मिर्झा रफी अहमद बेग* यांचे नाव,
*धनज माणिक वाडा* आहे त्यांचे गांव..।
मिर्झाजींचे गुरुजी होते *देविदास सोटे,*
मिर्झांजींचा एक काव्य संग्रह *घरावर गोटे..।*
कार्यक्रमात यांच्या वेळेचा लागत नाही पत्ता,
लय भारी असतो यांचा *जांगळबुत्ता*…।
*मिर्झा एक्सप्रेस* बनली आता सुपरफास्ट मिर्झा,
मिर्झाजी कहीन म्हणतात मी आहे *फक्त मिर्झा*..।
मिर्झाजींनी जीवनातील ओतला सारा सार,
तेव्हा कुठे यांचे *मिर्झायन* झाले तयार..।
मिर्झायन हे ६,००० ओळींचे *खंडकाव्य लिहिले*,
उठ आता गणपत, धुयमाती, धोतर गुतलं बोरीले..।
*सामाजिक प्रबोधनाचा* उचलला यांनी विडा,
धर्मनिरपेक्षता, शेतकऱ्यांची गेली ईडा पिडा..।
मिर्झा साहेब *महाराष्ट्राचे हास्यसम्राट*
म्हणून चाहतावर्ग आहे यांचा अफाट..।
मिर्झाजींची किती गोड *भाषा शैली,*
संपूर्ण देशात पोहोचवली *वऱ्हाडी बोली*..।
✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो. 9420095259*