सिंधुदुर्गनगरी
जलतरण तलाव (स्विमींगपूल) राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी वापरले जातील, असे जलतरण तलाव (स्विमींगपूल), योगा प्रशिक्षण संस्था व सर्व प्रकारचे इन डोअर गेम्स जसे बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, नेमबाजी इत्यादींना शरिरीक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळून चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
कंटेन्टमेंट झोनच्या बाहेरील सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्सेस इत्यादींच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सिनेमा हॉल, थिएटर, मल्टीप्लेक्सेस इत्यादी मध्ये प्रेक्षकांना खाद्य पदार्थ नेण्यास परवानगी असणार नाही. यासंबंधितचे नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन त्या-त्या विभागाने दिलेल्या सुचनांप्रमाणे करण्यात यावे.
वरील आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (44) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.