*प्लास्टिक सर्जरीमध्ये भारत विश्वगुरू असल्याचं जगाने केलं मान्य – डॉ. रविन थत्ते*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भारतात सुघटन शल्यचिकित्सा दिवस म्हणजेच प्लास्टिक सर्जरी दिवस हा १५ जुलै २०११ पासून साजरा केला जातो. तर २०२१ पासून हा दिवस जागतिक पातळीवर ‘प्लास्टिक सर्जरी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. प्लास्टिक सर्जरीची जनजागृती सर्व सामान्य नागरिकांमध्ये पोचवावी म्हणून १५ जुलै २०२३ रोजी नायर व कस्तुरबा रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाकडून तसेच त्यांच्या फाऊंडेशन व पीएचईई इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दिनांक १४ जुलै २०२३ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या भव्य सभागृहात सुघटन शल्य चिकित्सा नायर हॉस्पिटल विभाग प्रमुख डॉ. उदय भट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुंबई आणि राज्यभरातून डॉक्टर, विद्यार्थी, अभ्यासक, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि ह्या चिकित्सा पद्घतीची माहिती घेण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात हजर होते.
प्लास्टिक सर्जरी अर्थात सुघटन शल्य ह्या पुस्तकाचे लेखक डॉ. रविन थत्ते ह्यांनी ह्या चिकित्स पद्घती बद्दल सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी केलेल्या सर्जरी, त्यातून आलेले अनुभव आणि त्यांनी घेतलेला बोध हे त्यांच्या शब्दांतून ऐकताना सारंच विलक्षण जाणवत होतं. प्लास्टिक सर्जरीमध्ये भारत विश्वगुरू असल्याचं जगाने मान्य केलं, हे त्यांचं वाक्यच आजच्या निष्णात चिकित्सकांसह, उद्याच्या चिकित्सक आणि ही सर्जरी करून घेण्यास उत्सुक असलेल्या रुग्णांमध्ये नव्या आशेचा किरण दाखणारं ठरलं.
ही चिकित्सा पद्घती फक्त सौंदर्यवर्धक चिकित्सा पद्घती नसून ती अग्नी बाधित, कर्करोग बाधित,जन्मजात दोष, जंतू संसर्ग तसेच अपघातामुळे झालेल्या शारीरिक विकृतींतून निर्दोष कार्यक्षमता पूर्ण आयुष्य जगण्याची शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया केल्याने रुग्णांचे दैनंदिन कार्यक्षेत्रामध्ये पुनर्वसन होऊन ते पूर्वीसारखे कार्य करू शकतात, असे कस्तुरबा रुग्णालयाच्या सुघटनशल्य चिकित्सा विभागाच्या डॉ. मंगेश पवार यांनी दिली आहे.
भारतात आजमितीला २००० हून अधिक सुघटन शल्य चिकित्सक म्हणजेच प्लास्टिक सर्जन आहेत. प्रतिवर्षी २०० हून अधिक असे शल्यचिकित्सक निपुण होऊन तयार होतात. या पदवीसाठी खूप सामान्य शल्यचिकित्सक तयारी करतात. कारण ही शाखा प्रेरणादायी आणि भारतीय लोकसंख्येच्या गरजेला अनुसरून आहे. सुघटन शास्त्राला इतर शल्य शास्त्राप्रमाणे अवयव रचनेची सीमा नसते. केसापासून नखापर्यंत सर्व अवयवांवर शस्त्रक्रिया केली जात। इतर शल्यशास्त्र बाधित अवयवाला काढून रोग बरे करता. सुघटन शल्यशास्त्र बाधित अवयवाला कमीत कमी इजा करत सुघटित पूर्ण स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतात. सुघटन शास्त्र हे तत्वांवर आधारित शास्त्र आहे. या तत्त्वांमुळे विविध कठीण शस्त्रक्रिया नियोजित करणे सोपे जाते तसेच त्या तत्त्वाचे पालन केल्यास शस्त्रक्रियेच्या गुंतागुंती होण्याची शक्यता कमी होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यांनी आपले अनुभव कथन केले. तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे आयुष्य सुकर केल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
*संवाद मिडिया*
🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*
*🧑🏻🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩🎓*
*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*
*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨🎓👩🎓
🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇
◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*
https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*
♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*
*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*
*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰
*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*
🪪👩🏻🎓🧑🏻🎓
*स्कॉलरशिप*
*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*
*आताच भेट द्या –👇🏻*
*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*
*http://www.mitm.ac.in/*
*संपर्क -*📞
*02362-299195*
*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*
🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰
*FC Code-3440*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-