मालवण
तंत्रशिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये जयवंती बाबू फाऊंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. तृतीय वर्ष सिव्हिल विभागातील विद्यार्थी रसिका सारंग 84.21% प्रथम, जास्मिन वेरघेसी 79.84% द्वितीय, पूर्वा परब 79.21% तृतीय तर मॅकनिकल विभागातून दर्शन पालव 77.59% प्रथम, मनिष शिंदे 75.00% द्वितीय, मंदार नाईक 70.72% तृतीय क्रमांक मिळवला.
या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याकरिता कॉलेजचे सिव्हिल विभाग प्रमुख तथा एक्साम डीन प्रा. विशाल कुशे व मॅकॅनिकल विभागाच्या प्रमुख प्रा. काजल सुतार तसेच सिव्हिल आणि मॅकॅनिकलचे प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सचिव नेहा पाल, खजिनदार वृषाली कदम, प्राचार्य सूर्यकांत नवले, अकॅडमीक डीन पूनम कदम ऍडमिनिस्टेटीव ऑफिसर राकेश पाल यांनी विद्यार्थ्यांनचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.