You are currently viewing स्वरताल संगीत विद्यालय आणि राष्ट्रोळी मंडळातर्फे दोडामार्ग येथे उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

स्वरताल संगीत विद्यालय आणि राष्ट्रोळी मंडळातर्फे दोडामार्ग येथे उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

दोडामार्ग

येथील स्वरताल संगीत विद्यालय व श्री.राष्ट्रोळी कला, क्रीडा व ग्रामविकास मंडळ धाटवाडी, कसई-दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता.16) सायंकाळी ५ वाजता येथील महालक्ष्मी सभागृहात साजरी केली जाणार आहे.

यावेळी फ. रा. प्रतिष्ठान्चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, नगरसेविका वासंती मयेकर अँड. सोनू गवस, हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष सावंत, दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शैलेश नाईक, सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशन सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यकारिणी प्रतिनिधी सुरेंद्र देसाई आदी उपस्थित असणार आहेत.
या कार्यक्रमात गुरुपूजन, विद्यार्थी गायन, वादन, नृत्य, तसेच गुरुजन सत्कार, विद्यार्थी गुणगौरव, कलाकार सत्कार, गुरुपौर्णिमा विषयी मार्गदर्शन, पाहुण्यांचे मनोगत आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत तरी या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन स्वरताल संगीत विद्यालयाचे संचालक प्रेमप्रकाश नाईक व श्री राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा