You are currently viewing अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत राष्ट्रवादीचे एसटी विरोधात “हल्लाबोल” आंदोलन*

अर्चना घारे परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत राष्ट्रवादीचे एसटी विरोधात “हल्लाबोल” आंदोलन*

सावंतवाडी

येथील बस स्थानकाच्या विविध समस्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज येथील राष्ट्रवादीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी एसटी बस रोखून धरल्या. जोपर्यंत मागण्या पूर्ण करण्याबाबत ठोस आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत एसटी जाऊ देणार नाही, असा इशारा दिला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सर्व परिस्थितीला आमदार दीपक केसरकर जबाबदार आहेत, असा आरोप महिला नेत्या सौ. अर्चना घारे यांनी केला.

यावेळी सावंतवाडी एसटी बस स्थानकांची अवस्था अक्षरशा या दयनीय असेच झाले आहे. या ठिकाणी सोयी-सुविधा सोडाच साधे बसण्याची ही सोय नसल्याने, विद्यार्थी प्रवासी वर्ग तसेच महिला प्रवासी यांचे मोठे हाल होत आहेत. एकूणच या परिस्थितीबाबत महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादीच्या सौ. घारे परब यांनी एसटी प्रशासनाला अल्टिमेटम देत परिस्थिती सुधारण्याची मागणी केली होती. याबाबत तब्बल आठ वेळा त्यांनी पाठ पुरावा केला होता. मात्र एसटी प्रशासनाकडून कुठलीही मागणी पूर्ण न केल्याने, आज अखेर सौ. घारे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट बस स्थानकामध्ये जाऊन हल्लाबोल आंदोलन केले.
यावेळी त्यांनी बस स्थानकातून सुटणाऱ्या बसेस रोखून धरत प्रशासनाचा व राज्य सरकारचा तीव्र निषेध केला तब्बल दिड तास हे आंदोलन सुरू राहिले. यावेळी स्थानकामध्ये बसेस साठी उभ्या असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनीही आंदोलनात सहभाग दर्शवत आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली.
आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने एसटी प्रशासनाकडून पोलिसांना प्राचार्य करण्यात आले. परंतु, जोपर्यंत आमच्या मागण्या प्रशासनाकडून मान्य केल्या जात नाही आणि संबंधितच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार अशी, भूमिका सौ. घारे परब यांनी मांडली. यावेळी झालेल्या चर्चेत अखेर १२ ऑगस्ट पर्यंत स्थानकातील सर्व सोयी सुविधा तसेच प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे, लेखी पत्र कणकवली विभाग नियंत्रकांकडून देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मागण्या मार्गी न लागल्यास १५ ऑगस्ट रोजी कुठले कल्पना नेता पुन्हा यापेक्षाही मोठे हल्लाबोल आंदोलन छेडू असा, इशाराही सौ. घारे यांनी दिला.

या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष ॲड. रेवती राणे, जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री कुबल, चराटा ग्रामपंचायत सदस्य गौरी राऊळ, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, समीर सातार्डेकर,बावतीस फर्नांडिस, संतोष जोईल, इफ्तेकार राजगुरू , दर्शना बाबर देसाई, आशिष कदम, सावली पाटकर, मारीता फर्नांडिस, ॲड. राबिया शेख आगा, जहूर खान, राकेश नेवगी, नवल साटेलकर, याकूब शेख, जावेद शेख, वैभव परब, शेखर परब, आकाश पांढरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा