*माणसं जोडणारा माणुस म्हणजे गझलकार स्व.मधुसूदन नानिवडेकर डॉ.मिलींद कुलकर्णी*
*तळेरेत स्व.मधुसुदन नानिवडेकर द्वितीय स्मृतिदिन कार्यक्रम*
तळेरे : प्रतिनिधी
एका चांगल्या माणसाशी दुसऱ्या माणसाचे नाते जोडून देण्याचे काम नानिवडेकर यांनी केले. आयुष्यात अनेक अडचणी उद्भवल्या असूनही जगण्यावर प्रेम करणारा अत्यंत साधा माणूस म्हणजे नानिवडेकर. त्यांच्या अनेक गझलांमधून ते कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. तळेरे येथील डॉ. एम. डी. देसाई सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या मधुस्मृती या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात देवी शारदेसमोर दीपप्रज्वलन करून आणि मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, राजापूर अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, पत्रकार अनिकेत उचले, उमेश बुचडे, योगेश गोडवे, विनायक मेस्त्री, एज्युकेशनल अडव्हायजर सदाशिव पांचाळ, माजी सरपंच प्रवीण वरुणकर, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, उपाध्यक्ष उदय दुदवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ पत्रकार, प्रसिध्द गझलकार आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे मार्गदर्शक मधुसूदन नानिवडेकर यांचा द्वितीय स्मृतिदिनानिमित्त तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ, संवाद परिवार आणि प्रज्ञांगण यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम स्तब्धता पाळून मधुसूदन नानिवडेकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
गझल कार्यशाळेला सहकार्य : अजित सावंत
सदर कार्यक्रमात बोलताना कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत म्हणाले की, नानिवडेकर यांच्या स्मृतींचा जागर रहावा यासाठी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने गझल कार्यशाळा आयोजित करावी. त्याला कणकवली तालुका पत्रकार संघ सहकार्य करेल.
नानिवडेकर यांच्या स्मृती निमित्त काव्य स्पर्धा : राजेश जाधव
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी जाहीर केले की, 17 वर्षे वयातील नवोदित कवींची ‘पहिला पाऊस ‘ या विषयावर पुढील वर्षापासून मधुसूदन नानिवडेकर स्मृती प्रित्यर्थ काव्य स्पर्धा आयोजित केली जाईल. त्या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला रोख रुपये 5 हजार, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल.
यावेळी अविनाश मांजरेकर, अशोक करंबेळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी अथलेटिक्स तनश्री दुदवडकर हिला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक एन. बी. तडवी यांनी प्रोत्साहनपर स्पोर्ट्स शूजचे पारितोषिक देऊन गौरविले. तर पत्रकार अस्मिता गिडाळे यांचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय मारकड, सूत्रसंचालन उत्तम सावंत आणि आभार प्रकटन उदय दुदवडकर यांनी केले. या कार्यक्रमाला पत्रकार गुरुप्रसाद सावंत, सचिन राणे, संजय खानविलकर, अस्मिता गिडाळे, निकेत पावसकर रमेश जामसंडेकर, चित्रकार अक्षय मेस्त्री, प्रशालेचे शिक्षक सी. व्ही. काटे, प्रतिभा पाटील यांच्यासह विद्यालयाचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
छायाचित्र :
1. तळेरे येथील मधुस्मृती कार्यक्रमात बोलताना डॉ. मिलिंद कुलकर्णी, बाजूला अजित सावंत, हनुमंत तळेकर, अशोक करंबेळकर, दुर्गेश बिर्जे, सुरेश तळेकर, मांजरेकर,दत्तात्रय मारकड, उचले, दुदवडकर अन्य मान्यवर उपस्थित होते.
छाया : गुरुप्रसाद सावंत