You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक संस्थेचे १२ कर्मचारी सेवा देणार – आ.नितेश राणे

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सामाजिक संस्थेचे १२ कर्मचारी सेवा देणार – आ.नितेश राणे

कणकवली

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात खाजगी तत्वावर कर्मचारी भरती करण्यात येत असून राज्यातील बहुदा पहिला उपक्रम आहे.दर्जेदार रुग्ण सेवा मिळण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगली सेवा मिळावी याकरता रिक्त पदाची भरती एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय मी घेतला आहे. उद्यापासून हे 12 कर्मचारी कामावर रुजू होतील. अशी माहिती आम.नितेश राणे यांनी दिली.

कणकवली उपजिल्हात रुग्णालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राणे बोलत होते. यावेळी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी आदि उपस्थित होते.

डॉक्टरांकडून अनेकदा कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रुग्णसेवेत अडथळे येत असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता कर्मचारी वर्ग भरती केल्यानंतर रुग्णसेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आता मी या रुग्णालयातील कमतरतांच्या ऑपरेशनला सुरुवात केली आहे. हे केल्यानंतर सुधारणा झाली नाही तर पुढील टप्पा अवलंबला जाईल असे माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.

आम.नितेश राणे म्हणाले, माझ्या आमदारकीच्या ९ वर्षाच्या कालावधीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आली नाही,मी विरोधी पक्षात होतो.सरकार कडे मागणी करुनही डॉक्टर आणि रिक्त पदे भरली नाहीत.त्यामुळे आता कारणे सांगून चालणार नाही.सरकार आमचे आहे,माझा पाठपुरावा आहे.तोपर्यंत वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका संस्थेच्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १२ कर्मचारी उद्यापासून सेवा देणार असल्याची माहिती भाजपा आ.नितेश राणे यांनी दिली.रुग्णांना सेवा देताना आता कारणे चालणार नाही,असा इशारा डॉ.धर्माधिकारी यांना आ.नितेश राणेंनी दिला आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात येऊन २ जुलैला समस्यांबाबत आढावा घेतला होता.रुग्णांना सेवा का मिळत नाही?उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ओरोस किंवा अन्य ठिकाणी पाठवले जाते.या बाबत येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्ग ४ ची रिक्त पदे आणि लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले होते.त्यानुसार सरकारकडून भरती होण्यापूर्वी एका खासगी संस्थेमार्फत कनिष्ठ लिपिक ४ आणि वर्ग ४ साठी ८ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय शासकीय प्रोसेसच्या बाहेर जाऊन घेण्यात आला असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले. टीका करणे सोप आहे,या अगोदर सरकारकडून अपेक्षा केली पण काहीच मिळाले नाही.मात्र,राजकीय इच्छाशक्ती असली तर मार्ग सापडतो.मागच्या बैठकीत नेमकी किती लोक पाहिजे, विचारल्यावर १३ लोकांची मागणी होती. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ४ कनिष्ठ लिपिक आणि वर्ग ४ ची ८ कर्मचारी येत आहेत.पगार त्यांचा ती संस्था पाहणार आहे.याबाबत सिव्हील सर्जन यांच्याशी चर्चा केली आहे.उद्यापासून १२ लोक काम करणार आहेत.रुग्णांना सेवा देणार आहेत. डॉ.धर्माधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन काम केले पाहिजे.यापुढे तक्रारी चालणार नाहीत.काही आवश्यक यंत्र सामुग्री जिल्हा नियोजन समितीच्यावतीने देणार आहोत. याबाबतचा लवकरच पुन्हा आढावा घेऊन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील असे आ.नितेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा