You are currently viewing गोवेरी येथे साकवाची तातपूर्ती उपाययोजना करून जिल्हा नियोजन मधून नवीन साकवासाठी प्रस्ताव करा

गोवेरी येथे साकवाची तातपूर्ती उपाययोजना करून जिल्हा नियोजन मधून नवीन साकवासाठी प्रस्ताव करा

आमदार वैभव नाईक यांची कुडाळ गटविकास अधिकारी यांना सूचना*

*गोवेरी येथील पडलेल्या लोखंडी साकवाची आ.वैभव नाईक, संजय पडते यांनी केली पाहणी*

कुडाळ तालुक्यातील गोवेरी भगतवाडी येथील ओहळावरील पडलेल्या लोखंडी साकवाची पाहणी आज आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली.यावेळी ग्रामस्थांनी साकव दुरुस्तीची मागणी केली.आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्याशी संपर्क करत प्रथमतः सदर ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात लोकांची जाण्यायेण्याची सोय करावी. तसेच जिल्हा नियोजन मधून नवीन साकवासाठी प्रस्ताव करण्याची सूचना केली.
रविवारी सायंकाळी हा लोखंडी साकव कोसळला याच दरम्यान साकवावरून जाणारे ५ जण पाण्यात पडून जखमी झाले. या जखमींची देखील आमदार वैभव नाईक यांनी विचारपूस केली.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,अतुल बंगे, जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाखा अभियंता प्रीतम पवार, उपअभियंता राजेंद्र कुलांगे, गोवेरी सरपंच दशरथ परब, स्वरा गावडे, एम. बी. गावडे, उदय भगत, शिबा खान, उमेश घाटकर, राजेंद्र राऊळ, सत्यवान हरमलकर, राजन परब, बाळकृष्ण केळुसकर आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा