You are currently viewing वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांनी शेतबांधावर जाऊन घेतली इ पिकाची माहिती

वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांनी शेतबांधावर जाऊन घेतली इ पिकाची माहिती

वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांनी शेतबांधावर जाऊन घेतली इ पिकाची माहिती

वैभववाडी

तालुक्याच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या.वैभववाडी येथील माईणकरवाडीत शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन ई पीक पाहणीची माहिती दिली.

राज्यात १जुलै पासून ई पीक पाहणी मोहीमेला सुरुवात झाली आहे.शेतक-यांनी मोबाईल ॲपद्वारे आपल्या सातबारावर पीक नोंदणी करायची आहे.या मोहीमेची माहिती देण्यासाठी स्वतः तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या.
येथील माईणकरवाडीत भात लावणीचे काम सुरू होते.याठिकाणी सौ.देसाई यांनी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.मोबाईलद्वारे पीक नोंदणी कशी करायची याची माहिती दिली.यावेळी वाभवे तलाठी केदार बागल,एडगाव तलाठी राजेंद्र चरापले ,कोतवाल संतोष काळे व शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा