कणकवली :
कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कासार्डे येथे गुरुवार दि. १३ जुलै रोजी तलाठी भरती पूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून करिअर मेकर अकॅडमी मुंबईचे संचालक प्रा. संजय मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन शिबिराचा जिल्ह्यातील पदवीधर युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासना मार्फत तलाठी भरती जाहीर झाली आहे. राज्यात तलाठी (गट – क) संवर्गातील एकूण ४६४४ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४३ पदांसाठी ही भरती होणार आहे. अनेक वर्षापासून नोकरीच्या शोधात असणा-या उमेदवारांसाठी हि भरती आशेच किरण ठरणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे तलाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द होत आहे.
या कार्यक्रमात सरळसेवा भरती विषयी विस्तृत माहिती साठी म्हणजे वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, परीक्षेचा अभ्यासक्रम या विषयावर विनामूल्य केले जाणार आहे. हा कार्यक्रम गुरुवार दि. १३ जुलै रोजी सकाळी १० वा. कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालय, कासार्डे तिठा या ठिकाणी संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील युवक युवतींसाठि आमदार नितेश राणे यांनी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी रोहित महाडिक ७०६६९३१०५३ यांच्याशी संपर्क साधावा.