You are currently viewing मनसेतर्फे राबविलेले एक सही संतापाची आंदोलनाला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

मनसेतर्फे राबविलेले एक सही संतापाची आंदोलनाला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

मनसेतर्फे राबविलेले एक सही संतापाची आंदोलनाला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्ष अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रात एक सही संतापाची हे आंदोलन करण्याचे आदेश दिले होते आज सावंतवाडी मनसेच्या वतीने एक सही संतापाची आंदोलन करण्यात आले. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय चिखलमय परिस्थिती पाहता जनतेने आपला रोष व्यक्त करावा यासाठी ही सह्यांची मोहीम राबविण्यात आली आज सावंतवाडीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व सहयांच्या माध्यमातून नागरिकांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आपला रोष व्यक्त केला. तसेच उद्या गांधी चौक येथे अभियानाची सांगता करण्यात येणार आहे अशी माहिती उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी जनहित विधीकक्ष जिल्हा संघटक अनिल केसरकर माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर कार्याध्यक्ष संतोष भैरवकर मनविसे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे सतीश आकेरकर अतुल केसरकर प्रवीण गवस राकेश परब साहिल तळकटकर तसेच मोठ्या संख्येने मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा