You are currently viewing तुझं येणं…!

तुझं येणं…!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम ललित लेख*

*तुझं येणं…!*

खरंच, सत्य होतं की दिवास्वप्न होतं ते…?
तुझं माझ्या आयुष्यात येणं…!
अजूनही आठवतंय मला…
जराशी लाजतच…
मान खाली घालून गालातल्या गालात हसत…
थरथरणाऱ्या अधर पाकळ्यांना दातांमध्ये घट्ट दाबत…
हळूच नयनांचा तिरका कटाक्ष माझ्याकडे टाकत…मी पाहताच शरमेने लालेलाल होत…काहीशी बिचकतच आलेलीस…
विश्वासाने माझ्या हाती तुझा कोमल हात दिलेलास तू…
अन् नकळत मी सुद्धा मनातल्या मनातच तुज वचन दिलेलं…

“जशी नाजूक बकुळ फुले ओंजळीत घेतात अन् आयुष्यभर त्यांचा मोहक सुगंध हृदयात, पुस्तकात जपून ठेवतात…
अगदी तसेच तुझे नाजूक…कोमल पदकमल मी माझ्या ओंजळीत घेऊन.. बकुळ फुलांसम आयुष्यभर सांभाळून ठेवीन…!”
कारण…
तुझं येणं माझ्या आयुष्यात…हीच तर नांदी होती सुखद जीवन प्रवासाची…अन् सोनेरी स्वप्नांची…!

तुझ्या संगे जगताना
विसरून जातो जगाला
तू सोबत असताना सखे
संगत हवी कुणाची कशाला..?

नवी नवरी बनून तू जीवनात आलीस…मेहंदीने रंगलेले तुझे गोरेगोमटे नाजूक कोमल पदकमल माझ्या दारी पडताच…मी कमळ पुष्पांनी भरलेल्या माझ्या ओंजळीत ते झेलले…
माहिती आहे का तुला, माझी ओंजळ कमळ पुष्पांनी मी का भरून घेतलेली…???
कारण…तुझ्या नाजूक पायांना माझ्या हातांच्या तळव्याचा शुष्क…कोरडा स्पर्श होऊ नये….
त्या कोरड्या स्पर्शाने तुझ्या सुंदर, नाजूक, कोमल पदकमलांना वेदना तर होणार नाहीत ना.. ही भीती माझ्या मनाच्या गाभाऱ्यात खोलवर घर करून बसली होती…
पण …
तुझ्या कोमल पद कमलांचा स्पर्श माझ्या ओंजळीस होताच… ओंजळीतील कमळ पुष्पे अलगद ओंजळीतून निसटून धरणी मातेच्या कवेत शिरली… अन् सोनेरी पैंजणांनी सालंकृत केलेले तुझे पदकमल नकळत माझ्या ओंजळीत विसावले… त्या पैंजणांच्या घुंगरुंची छमछम माझ्या कर्ण पाकळ्यांवर निनादू लागली… त्या सुमधुर निनादात मी मंत्रमुग्ध होऊन तुझ्या कोमल पदकमलांना गोंजारू लागलो…
जणू यमुनेच्या निळ्याशार जलाशयात राधेने आपले सुंदर, कोमल पदकमल सोडून विसावावे, गुणगुणावे…

*पायलिया बजनी ला दो हरी,*
*मुझे ला दो हरी पहना दो हरी,*

*पायलिया पहन मैं तो जमुना गई,*
*गोपियां देखें खड़ी मुस्कामें हरी,*
*पायलिया बजनी ला दो हरी…..*
अन् नटखट, खट्याळ सावळ्या कान्हाने यमुनेच्या खोलवर जलाशयातून आपले हस्त वर काढून…आपल्या कोमल हस्तांवर राधेचे सुकोमल पदकमल घ्यावेत… त्यांचे सौंदर्य न्याहाळत शरमेने लालेलाल झालेल्या राधेच्या नयनांत आपल्यावर असलेले भौतिक प्रेम पाहत बसावे… कित्ती अलौकिक दृश्य असेल ना ते…?
राधा कृष्णाचं नातं पवित्र होतं… राधा कृष्णाची पत्नी नव्हती…पण तरीही राधेश्याम, राधाकृष्ण अशी दोघांची नावे एकत्रच उच्चारतात.. आपल्या लाडक्या भक्ताचे पदकमल आपल्या ओंजळीत श्रीकृष्णप्रभू घेतात तिथे तुझे पदकमल मी माझ्या ओंजळीत घेतले तर तू का एवढी लाजतेस…?
सखे, त्या सुंदर, नाजूक पदकमलांनी कधी धरणीवर उतरूच नये असे मला वाटते…त्यांनी या ओंजळीतच आपलं घर करावं असंच मनोमन वाटू लागलंय… एवढी सुंदरता, कोमलता तुझ्या पदकमलांमध्ये आहे…
मला तर तुझे पदकमल म्हणजे राधेचेच पद असल्यासारखा भास होतोय….
मी कृष्ण नाही… नव्हतोच…नसेनही…
पण, तू मात्र राधेसारखीच माझ्यावर निस्सीम प्रेम करत राहिलीस…
कसलाही स्वार्थ, किंतु, परंतु मनाशी न बाळगता…
मी डुंबत गेलो तुझ्यात आणि तुझ्या प्रेमात… खोलवर बसलो तुझ्या हृदयात…
तू निर्विकारपणे प्रेम करत राहिलीस…माझ्या सगुण रूपावर…! अन् अखेर पौर्णिमेच्या रात्रीतल्या निळ्याशार आभाळातील चमकणाऱ्या शुभ्र धवल, पिठुर चांदण्याच्या साक्षीने स्वप्नागतच तू स्वप्नवत माझ्या आयुष्यात आलीस…!
माझी प्राणप्रिय सखी, राधा, राज्ञी बनून कायमची…!!

©दीपक पटेकर [दीपी]
सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

*संवाद मीडिया*

*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️

*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤‍🩹

✴️ *मान्सून ऑफर* ✴️

*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*

https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.

✴️ उत्पादने.

*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*

*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फ‌ँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.

*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*

*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)

*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.

*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.

*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक

*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.

*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*

कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*

🌎 Visit: www.mvetcare.com

*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा